Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध निर्माती एकता कपूर कोरोनाच्या विळख्यात; इंस्टाच्या माध्यमातून दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा कहर पुन्हा एकदा चांगलाच वाढला आहे. राजकीय क्षेत्र असो वा मनोरंजन प्रत्येक क्षेत्रात आज कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर येत आहे. अलीकडेच अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. यानंतर प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आपल्या चाहत्यांना आणि प्रियजनांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना दिसत आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेते जितेंद्र कपूर यांची कन्या आणि प्रसिद्ध निर्माती- दिग्दर्शिका एकता कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. याबाबत तिने स्वतःच अधिकृत माहिती दिली आहे.

निर्माती- दिग्दर्शिका एकता कपूरने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आणि प्रियजनांना याची माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एकताने लिहिले कि, सर्व खबरदारी घेऊनही माझी चाचणी कोविड पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या ठीक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की त्यांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्यावी. अश्या पद्धतीने एकता कपूरने अलीकडेच तिच्या संपर्कात आलेल्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक अशा प्रत्येकालाच स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

एकता कपूर ही एक भारतीय टेलिव्हिजन निर्माती, चित्रपट निर्माती आणि यशस्वी दिग्दर्शिका आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिका आणि अनेक सुपरहिट चित्रपट मनोरंजन सृष्टीला दिले आहेत. १९९४ सालामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड या प्रॉडक्शन हाऊसची ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि क्रिएटिव्ह हेड आहे.

तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जितेंद्र कपूर यांची कन्या आणि अभिनेता तुषार कपूर याची ती बहीण आहे. क्योंकी सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी कि, कुमकुम भाग्य, नागीन, पवित्र रिश्ता अश्या अनेक लोकप्रिय मालिका तिच्या नावे आहेत. तर एक व्हिलन, रागिनी एम एम एस, क्या कुल है हम, हाफ गर्लफ्रेंड, पगलैट, एक थी डायन, ड्रीम गर्ल हे हिट चित्रपट तिच्या नावे आहेत.