Take a fresh look at your lifestyle.

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर; भाची रचना शहांनी दिली अधिकृत माहिती 

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या ९२ वर्षांच्या असून तब्येतीच्या तक्रारींमुळे सतत त्रस्त असतात असे सांगण्यात आले होते. यानंतर आज त्यांच्या भाचीकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाली आहे. लता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आता लता दीदींची प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्यांच्या देखरेखीसाठी उत्तम डॉक्टरांची टीम नेमण्यात आलेली आहे त्यामुळे तूर्तास चिंतेचे कारण नाही.

लता मंगेशकर यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या भाजी रचना शहा यांनी दीदींच्या हेल्थ अपडेट जारी केल्या आहेत. लतादीदींची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्या लवकरच बऱ्या होतील अशी माहिती रचना शाह यांनी दिली आहे. सध्या दीदी ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांच्या वयामुळे इतरही अनेक आरोग्यविषयक समस्या त्यांना आहेत. त्यामुळे डॉक्टर दीदींची विशेष काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय लता दीदींना पुढील काही दिवस रुग्णालयात राहावे लागू शकते याबाबत कल्पना देखील देण्यात आलेली आहे असे रचना यांच्याकडून समजत आहे.

यापुढे रचना म्हणाल्या की, लता दीदी पूर्णपणे स्थिर आहेत. देव खरोखर दयाळू आहे. कोरोनावर विजय मिळवून ती लवकरच घरी येईल, अशी आशा आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचे मला आभार मानायचे आहेत. जेव्हा बरेच लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत, तेव्हा त्यांची प्रकृती लवकरच बरी होऊ शकते. याशिवाय ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतीक समदानी यांनीही निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी सांगितले आहे की, लता दीदींसाठी सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली. तसेच त्यांच्यावर उत्तम उपचार आम्ही करत आहेत. त्या बऱ्या होत असल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिले जाऊ शकत नाही.

 

लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आजतागायत त्यांना हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे.