Take a fresh look at your lifestyle.

दोनाचे झाले तीन..! कुल्फीकुमार बाजेवाला फेम मोहित मलिकच्या घरी हलला पाळणा; सोशल मीडियावर पडला शुभेच्छांचा पाऊस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुल्फिकुमार बाजेवाला’ फेम प्रसिद्ध अभिनेता मोहित मलिक आणि त्याची पत्नी अभिनेत्री आदिती शिरवईकर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे नुकतेच आगमन झाले आहे. लग्नाच्या दहा वर्षानंतर ते आता पालक बनले आहेत. मोहित आणि अदितीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, हे दोघेही आता एका मुलाचे पालक बनले आहेत. मोहितने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘धन्यवाद माझ्या प्रिय चिमुकल्या विश्वाचे. रात्रभर रडण्याबद्दल आणि त्यासह या जगात आलेल्या या आश्चर्याबद्दल धन्यवाद. कारण आम्हाला खूप भाग्यवान वाटत आहे की, आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत केले.’

मोहित आणि आदिती यांनी आपला आनंद व्यक्त करीत लिहिले कि, शेवटी आपला मुलगा या जगात आला आहे. आता आम्ही दोनाचे तीन झालो आहोत. हेच आमचे सगळे सुख आहे. मोहित आणि अदिती यांचे लग्न २०१० डिसेंबर मध्ये झाले होते. अलीकडे, त्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी मोहितने पत्नीच्या डोहाळ जेवणाची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. हा डोहाळ जेवणाचा विधी पाश्चिमात्य नसून पारंपारिक शैलीत आयोजित करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी मोहितची पत्नी अभिनेत्री अदिती शिरवईकरने देखील बाळाबद्दल बोलताना एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ‘प्रिय मुला, अशा कठीण काळात तू या जगात येत आहेस.. हे अवघड आहे, आव्हानात्मक आहे, व्हायरस-केंद्रित आहे. पण लक्षात ठेव आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर राहू. आम्ही नेहमीच तुझे रक्षण करू. आम्ही आतुरतेने तुझ्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत. तू आमचे आयुष्य खूप सुंदर बनवले आहेस.’

मोहित आणि अदितीची भेट ‘मिली’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे नटे फुलले आणि ते लग्न बंधनात अडकले. मोहित नुकताच स्टार प्लस वाहिनीवरील ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’ या मालिकेत दिसला होता. मोहित गेली १५ वर्षे मालिकांच्या दुनियेत कार्यरत असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र तो विशेष पसंतीस पडला तो गुल खान निर्मित मालिका ‘कुल्फिकुमार बाजेवाला’ या मालिकेत त्याने साकारलेल्या भूमिकेमुळेच. या भूमिकेचे त्याच्या चाहत्यांकडून खूप कौतुक झाले होते. तर अदिती शिरवईकरने खूप वर्षांपूर्वीच या इंडस्ट्रीतून एक्सिट घेतली होती. मात्र ‘शरारात’ या मालिकेतील तिची ‘मिता’ हि भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.