Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर ; पण…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | प्रसिद्ध हिंदी सिरीयल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने अत्यंत कमी कलावधीत कलाविश्वात तिचं विशेष स्थान निर्माण केलं आहे. आज लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये हिना खानचे नाव घेतलं जातं. विशेष म्हणजे अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हिनाला खरं तर अन्य दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचं होतं. तसंच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’साठी अचानक तिची निवड झाली होती असं हिनाने सांगितलं.

हिना खानला हवाईसुंदरी म्हणजेच एअर होस्टेस व्हायचं होतं. लहानपणापासून तिने हे स्वप्न पाहिलं होतं. मात्र ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या माध्यमातून अचानक तिचं कलाविश्वात पदार्पण झालं आणि याच क्षेत्रात तिचं करिअर झालं.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. या ऑडिशनसाठी हिनादेखील सहज ऑडिशनच्या ठिकाणी गेली होती. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी मालिकेच्या दिग्दर्शकांनी हिनाला फोन करु तुझी अक्षरा या मुख्य भूमिकेसाठी निवड झाली आहे, असं सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’