Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध TV अभिनेत्रीची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका क्षेत्रातून सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगाली टीव्ही मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी डे’ने आत्महत्या केली आहे. होय. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी गळफास घेत यीन मृत्यूला आलिंगन दिले आहे. बंगाली टीव्ही विश्वातील लोकप्रिय पल्लवी डे हिचा मृत्यू हि बातमी संपूर्ण कला विश्वाला चटका लावणारी आहे. रविवारी दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी पल्लवीचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेला आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे हिने तिच्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज रविवारी १५ मे २०२२ रोजी सकाळी अभिनेत्रीचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. सध्या पोलीस या प्रकरणाचा खोल तपास करत आहेत. सध्या पल्लवीच्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडालेली आहे. आतापर्यंत पल्लवीने अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. तिच्या चाहत्यांसाठी तिच्या आत्महत्येची बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

पल्लवी डे हिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे थेट सकाळी समजले. मात्र शेवटची आशा म्हणून तिला तात्काळ बांगुर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे ‘मन माने ना’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारत होती. या भूमिकेमुळे तिच्यावर आईंक लोक प्रेम करत होते. पल्लवीच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर तिला ‘रेशीम झंपी’ या टीव्ही मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली.