Take a fresh look at your lifestyle.

सेल्फी काढला, किस केला आणि निघून गेला.. चाहत्याने केला अर्शी खानला किस, व्हिडीओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस फेम’ अर्शी खान हि तिच्या नौटंकीमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी ड्रामा तर कधी मेलोड्रामा. बिग बॉसच्या घरात राखी सावंतला चुरशीची लढत देणारी अर्शी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. कारण ऐकाल तर हसायचं कि आश्चर्यचकित व्हायच हेच तुम्हाला कळणार नाही. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सगळ्यांशी तू तू मै मै करणाऱ्या आरशींसोबत एका चाहत्याने असा किस्सा केलाय कि तिलाही क्षणभर कळलं नाही कि बोलू के नही बोलू..एअरपोर्टवर अर्शी मीडियाशी बोलताना तो आला आणि अचानक अर्शी खानला किस करून निघून गेला. तिचा हा व्हिडीओ सध्या अतिशय चर्चेत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडीओ नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिशियल इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. काल रात्री अर्शी एअरपोर्टवर दिसली होती. तिने काळ्या रंगाचा ड्रेस, डोळ्यांवर गॉगल लावला होता. तिचा अंदाज पाहून सगळे फोटोग्राफर्स तिच्याभोवती जमा झाले. अर्शी खान फोटोग्राफर्सशी बोलत असताना अचानक एक चाहता आला. त्याने अर्शीसोबत सेल्फी काढला. सेल्फी घेतल्यानंतर अचानक अर्शीचा हात हातात घेऊन त्यावर किस करून लगेच निघून गेला. क्षणभर अर्शीलाही काय झाले काही कळले नाही. ती आश्चर्यचकित होऊन त्या चाहत्याकडे नुसती बघत राहिली आणि मग, चलो चलो… हो गया अभी असे म्हणत तिथून निघून गेली.

अर्शी खानचा हा व्हिडीओ अगदी काहीच तासांतच व्हायरल झाला. हा व्हिडीओ ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.हा व्हिडीओ पाहताच तिच्या चाहत्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. काहींनी तिला त्या चाहत्याविरोधात पोलिस तक्रार कर असा सल्ला देखील दिला आहे. अर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. अर्शीचे इन्स्टाग्रामवर १.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.