Take a fresh look at your lifestyle.

‘आजही भावना आणि वेदना त्याच आहेत’; ‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर पाहून नेटकरी झाले भावुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मीर पंडित यांच्या जीवनावर आधारित आणि एक नवे कथानक असणारा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. निर्मात्यांच्या घोषणेनुसार येत्या ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. या चित्रपटाचा आता आणखी एक नवा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांनी आजही त्या भावना आणि वेदना जश्या होत्या तश्याच आहेत अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित आहे. साल १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी केलेल्या स्थलांतरावर आणि काश्मीरमध्ये झालेल्या नरसंहाराचे हा चित्रपट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या ११ मार्च २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून आतापर्यंतच्या या दुसऱ्या ट्रेलरपर्यंत प्रेक्षकांनी उत्सुकता कायम ठेवली आहे. या चित्रपटातील घटना आणि भावनेचा भाग होण्यासाठी प्रेक्षकवर्ग आता सज्ज झाला आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले कि, हा ट्रेलर बघून डोळ्यात पाणी आलं, खरंच “कश्मिरी पंडितांची ही कहाणी प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे”. तर दुसऱ्याने लिहिले कि, “हा फक्त चित्रपट नाही तर आमच्या भावना आहेत”. आणखी एकाने लिहिले कि, या भावना आणि वेदना आजही तश्याच आहेत. याशिवाय आणखी एकाने प्रतिक्रिया देताना लिहिले कि, ”मागचे कित्येक दिवस या चित्रपटाची मी वाट पाहत होतो. अखेर त्याचा ट्रेलर आला आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शकांचे खूप आभार”.