Take a fresh look at your lifestyle.

हातात काठी आणि चालण्यासाठी हवा आधार, तरीही बबिताजींच्या वाढदिवसासाठी रणधीर कपूर हजर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांची तब्येत दिवसागणिक खालावू लागली आहे. शक्यतो ते घराबाहेर दिसत नाहीत. पण नुकतेच त्यांना मुलगी करिनाच्या घराबाहेर पाहाण्यात आले. बबिता यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंबाने करिनाच्या घरी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी रणधीर कपूर यांना गाडीतून उतरल्यावर चालण्यासाठी दोन जणांच्या आधाराची गरज घ्यावी लागली. त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांना फार वाईट वाटले. मात्र त्याहीपेक्षा जास्त चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रणधीर यांनी त्यांची काळजी घ्यावी. कोरोनाच्या काळात बाहेर पडायला नको होते. बबिताजींचा हा पहिला वाढदिवस नाही. असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरल भयानी याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यांची भावंडे ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्या निधनानंतर रणधीर खचले आहेत. ऋषी आणि राजीव यांच्या निधनामुळे मी पूर्णपणे कोलमडलो होतो असे त्यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. गेल्या काही महिन्यात माझ्या घरातील सदस्यांच्या एकामागे एक झालेल्या निधनामुळे मी संपूर्णपणे कोलमडून गेलो आहे. राजीवला कधीच कोणत्या प्रकारचा आजार नव्हता. राजीव खूपच खेळकर वृत्तीचा होता. तो आता आपल्यात नाही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. आता मी त्या घरात एकटाच शिल्लक राहिलो आहे.

त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांचा एक तारुण्यातील फोटो शेअर केला होता. त्यासोबत लिहिले होते की, मी तुम्हाला खूप मिस करतोय… तुम्ही जिथे असाल तिथे सुखात राहा… रणधीर कपूर यांचा हा व्हिडीओ पहिल्या नंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. सोबतच रणधीर यांनी कोरोनाच्या काळात एखादा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडणे योग्य नाही असे अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.