Take a fresh look at your lifestyle.

‘पुष्पा’ चित्रपटातील समंथाच्या गाण्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मूळ तेलगू भाषिक बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ हा शुक्रवारी अर्थात १७ डिसेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मीका मंदाना हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट एकंदरच अल्लू अर्जुन आणि फहाद फासिलच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच आहे. या चित्रपटात एक गाणे असे आहे ज्यामध्ये अभिनेत्री समंथा अक्किनेनीने ठुमके लगावले आहेत. आता समंथाचा चाहतावर्ग म्हणाल तर फारच मोठा आहे. त्यामुळे तीच ओ ओ अंतावा हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल आहे.

‘पुष्प’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमा रिलीजआधी समंथाच्या ट्रॅकचा मुख्य म्युझिक व्हिडिओ ऑनलाइन रिलीज केला नव्हता. मात्र चाहत्यांची चलबिचल करण्यासाठी एक लिरिकल व्हिडिओ रिलीज केला होता. यातील समंथाचा वेगळा लूक पाहून चाहत्यांमध्ये गाण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आणि निर्मात्यांचा हाच काय तो हेतू साध्य झाला. हे गाणे रिलीझ झाल्यापासून अवघ्या सात दिवसांत, लिरिकल व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळाले. याचसोबत १९ सेकंदांचा आणखी एक प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला होता.

यानंतर आता हा सिनेमाच रिलीज झाल्याने समंताचं वेड लावणारं गाणं चाहत्यांना थिरकायला भाग पाडत आहे. तेलंगणा आणि आंध्रामध्ये या गाण्यावर थिएटरमध्ये चाहते अगदी थिरकत आहेत. तेलुगू भाषेतल्या या गाण्याला यूट्यूबवरही प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडिया ट्रेंडिंगला आहे.

इंद्रावती चौहान या गायिकेच्या आवाजातील हे गाणं चांगलाच गाजतंय. आता ओरिजिनल व्हिडिओ सॉन्ग रिलीज झालं असून हे गाणं तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीतही रिलीज झालंय. या गाण्यावर चाहते थिरकत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.