हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील सुंदर, ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमध्ये क्रिती सॅनॉनचं नाव असं कसं शक्य आहे. क्रिती सॅनॉन फार कमी काळात भव्य यश संपादन करणारी अभिनेत्री आहे. विविध चित्रपटांच्या माध्यामातून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. क्रिती सॅनॉन अनेकदा सोशल माकडियावर सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची संधी क्रिती कधीच सोडत नाही. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोने चाहत्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री क्रिती सॅनॉनने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये क्रितीने लाईट स्काय ब्लु रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तीने टची स्पोर्ट शूजसोबत आपला लूक पूर्ण केला आहे. मोकळे केस आणि मारक नजर.. हाये.. अर्ध्या विकेट तर इथेच पडल्या असतील. क्रिती या फोटोमध्ये सोफ्यावर एकदम स्टायलिश अंदाजात बसली आहे. तिचा लूक आणि नजर दोन्हीही कातिलाना आहेत. आता इतकं सुंदर कुणी दिसेल तर कोण प्रेमात नाही पडणार. असंच काहीस नेटकऱ्यांचं झालंय.
अभिनेत्रींच्या या फोटो पोस्टवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘यार असं नको बघत जाऊ.. मी मरून जाईन’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘इतकी सुंदर दिसू नकोस..’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘अब जान लोगे क्या..?’. याशिवाय अन्य अनेकांनी तर हार्ट ईमोजी आणि फायर इमोजीचा पाऊस पाडला आहे. क्रिती सॅनॉन वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘ती नुकतीच वरूण धवनसोबत भेडिया चित्रपटात दिसली आहे. यानंतर ती लवकरच आदिपुरुष, शेहझादा आणि गणपथमध्ये दिसणार आहे.
Discussion about this post