Take a fresh look at your lifestyle.

तिची भाषा आणि माज.. एकदम माहोल! प्राजक्ताच्या चाहत्यांकडून रत्नाच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असली तरीही तिची अशी एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर आहे. सुंदर आणि सोज्वळ अशी प्राजू कित्येक तरुणांच्या दीलाची राणी आहे. त्यात सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांमध्ये प्राजक्ताचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली आणि ती चर्चेत आली नाही तर नवंलच. अलीकडेच तिची रानबाजार ही बोल्ड वेबसिरिज रिलीज झाली आहे आणि एकीकडे ट्रोलींग सुरू असताना दुसरीकडे प्राजक्ताच्या रत्ना या भूमिकेवर तिचे चाहते भारी खुश झाले आहेत

अभिजित पानसे दिग्दर्शित ‘ रानबाजार’ ही क्राईम आणि थ्रिलर बेस अशी बोल्ड वेब सीरिज आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित सह प्राजक्ता माळीनेही बोल्ड भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्राजक्ताने पहिल्यांदाच अशी भूमिका साकारल्यामुळे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तिच्यावर प्रचंड टीका झाल्या. काहींनी तिच्या भूमिकेवरून तिच्या चारित्र्यावर देखील भाष्य केले. मात्र चाहत्यांनी तिच्या कलेचे आणि तिने साकारलेल्या रत्नाचे भरभरून कौतुक केले आहे.

प्राजक्ताचे शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने रत्ना असलेल्या पोस्टर सह एक कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय की, हीची भाषा आणि हीचा माज, तसाच राहील… काल, उद्या आणि आज! प्राजक्ता माळी as रत्ना… बघितली का..? ‘ रानबजार ‘ प्लॅनेट मराठी ओटिटीवर! यावर अनेक चाहत्यांनी ही बघितली.. तू फार छान काम केलं आहेस अस म्हणत तीच कौतुक केलं आहे. एकाने लिहिलंय की, खूप खूप शुभेच्छा प्राजू! खूप मस्त अभिनय केलाय.. जबरदस्त स्टारकास्ट आहे.. सांगायचं झालं तर एकदम माहोल..! अशा पद्धतीने सोज्वळ भूमिकेत दिसणारी प्राजू बोल्ड भूमिकेत सुद्धा प्रेक्षकांना आवडतेय हे दिसून येत आहे.

प्लॅनेट ओटीटी मराठी निर्मित आणि अभिजित पानसे दिग्दर्शित रानबाजार हि वेब सिरीज एक अत्यंत आक्रमक तशीच लक्षवेधी सिरीज आहे. नुकताच रिलीज झालेलया या वेब सीरिजने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. थरार काय असतो..? हे जर जाणून घ्यायचं आहे तर हि वेब सिरीज पहायलाच हवी. इथे सगळेच धंदा करतात म्हणत राजकारणातील मालिन वृत्तीवर भाष्य आणि जळजळीत टीका करणारी हि वेब सिरीज अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. हि वेब सिरीज एक पॉलिटिकल क्राईम थ्रिलर ड्रामा असून २० मे २०२२ रोजी रिलीज झाली आहे.