Take a fresh look at your lifestyle.

हिना खानच्या हॉट फोटोवर चाहत्याने दिली केस करण्याची धमकी; हिनाने दिले उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ये रिश्ता क्या कहलाता है या हिंदी मालिकेतील अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खान नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिचे अनेक फोटोशूट चांगलेच वायरल होतात. नुकटाच तिने केलेल्या हॉट फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली होती. मात्र हिनाचा एक चाहता तिच्यावर तक्रार दाखल करण्यास जाणार आहे, असे म्हणतोय. या गोष्टीमुळे हिना पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

हिना बऱ्याचदा बिकिनी, ब्रालेट आणि बॉडीकॉन परिधान करून फोटोशूट करीत असते. तिचे या ड्रेसेसमधील तिचे फोटो ती आपल्या सोशल मीडियावरसुद्धा शेअर करत असते. तिच्या अदा आणि तिचा फॅशनसेन्स चाहत्यांना नेहमीच आवडतो. हिनाने मुक्ततेच सध्या अगदी जोरदार ट्रेंड होणारे हॅशटॅग Ask Me Anything हे सेशन ठेवलं होते, ज्याद्वारे चाहत्यांनी त्यांचे प्रश्न हिनाला विचारले. या प्रश्नोत्तरांमध्येच एका चाहत्यानं हिनाच्या हॉटनेसबद्दल असं काही लिहिलं आहे की ती स्वत: देखील हसू लागली आहे. चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘ मी तुमच्याविरुद्ध केस करेन की इतक्या उकाड्यात तुमचा हॉट अंदाज आम्हाला मारून टाकेल.’ त्यावर हिना खानने हसत हसत उत्तर दिलं – ‘कर दीजिए’.

हिना खानने काही दिवसांपूर्वीच मालदिव वेकेशनचे फोटो शेअर केले होते. फोटोमध्ये तिने रंगबिरंगी मोनोकोनी परिधान केलेली. हिना डोळ्यावर गॉगल लावून रिलॅक्स दिसत आहे. तिच्या रुपावर अनेक प्रतिक्रिया आल्या. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेला नुकतीच १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हिना म्हणाली, लोकांमुळे मी या शोसोबत कायमची जोडली गेली, घरोघरी पोहोचली. जे प्रेम, सकारात्मक दृष्टी आणि प्रेरणा मला अनेक लोकांकडून मिळाली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है सोबतच खतरों के खिलाडी, कसोटी जिंदगी की २ मध्ये तिने काम केले आहे.