Take a fresh look at your lifestyle.

‘फरार’ या चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने घरातच स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फरार, रोमी द हिरो, आज की औरत यांसारख्या छोट्या बजेट चित्रपटांची निर्मिती केलेले निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने राहत्या घरी स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी अंधेरी येथील डी.एन.नगर परिसरातील त्यांच्या घरी सोमवारी दुपारी आत्महत्या केली.

घरातून आगीचा जाळ बाहेर येत असल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला बोलावले. अग्निशामकचे जवान येताच त्यांनी दोघींना घरातून बाहेर काढले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करताच अस्मिता यांचे निधन झाले. मुलगी सृष्टी ७० टक्के भाजलेली असलेल्यामुळे ऐरोली नॅशनल बर्नमध्ये तिला उपचारासाठी त्वरित दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचे मंगळवारी निधन झाले.

पत्नी अस्मिता गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. तर सृष्टी आईच्या आजारामुळे टेन्शमध्ये असायची. त्या दोघींच्या आत्महत्येचे हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. डी.एन.नगर पोलिस चौकीत अस्मिता आणि सृष्टी यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून सध्या चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.