Take a fresh look at your lifestyle.

‘तो आंब्यांचा व्हिडीओ कोणी शूट केला रे, फराह खानने घेतल फोटोग्राफर्सला फैलावर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसापूर्वीच फराह खानचा आंबे खरेदी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ प्रचंड वेगाने वायरल झाला. व्हिडीओ काहीसा मजेशीर होता. मात्र हा व्हिडीओ पाहून काहींनी फराहला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. हा व्हिडीओ पाहून काहींना नवल वाटले तर, काहींनी विविध प्रकारच्या टीका करणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पाडला. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर फराहची नजर पडली असता तिने मीडिया फ्रोटोग्राफर्सची चांगलीच शाळा घेतली. पुन्हा एकदा मीडियाच्या कॅमे-यासमोर फराह आली ती थेट फोटोग्राफेर्सना फैलावर घेतानाच दिसली. ‘तो व्हिडीओ कोणी शूट केला होता?’, असे तिने विचारले.

या वायरल व्हिडीओत ती फळ विक्रेत्यासोबत बार्गेनिंग करताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर अगदी चेह-यावरचा मास्क काढत आंब्यांचा वास घेतानादेखील दिसते. फराह या व्हिडिओत फळविक्रेत्याला चांगले आंबे दे… असे बजावताना दिसतेय. फराहला अशा अंदाजात आंबे खरेदी करताना पाहून मीडियाच्या कॅमे-याच्या नजरा तिच्यावर आपसूकच वळल्या आणि मीडियाच्या कॅमे-यात फराह खान कैद झाली.

तिने टी-शर्ट आणि पँट घातली असून तिचा हा लूक खूपच छान दिसत आहे. तिने चेहऱ्याला मास्क देखील लावला आहे. पण तिच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. ​’मास्क काढून आंब्यांचा वास कोण घेतं? कोविडचं संक्रमण होत असताना आणि तेही महाराष्ट्रात. कॉमन सेन्स विकून आंबे खरेदी केले का?’ दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘अखेर इन्फेक्शन नाकापर्यंत पोहोचलंच’ तर आणखी एका युझरनंही फराहवर टीका करताना लिहिलं, ‘असंच वागायचं तर मग मास्क वापरण्याचा फायदाच काय आहे.’ या अश्या अनेक कमेंट्सने फराह ट्रोल झाली.

तिचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ फराहने पहिला आणि मीडिया फोटोग्राफेर्सला तो व्हिडीओ कोणी शूट केला होता? असे थेट विचारले. तिचा प्रश्न ऐकताच सारे हसायला लागतात आणि प्रश्न टाळत तिलाच विचारतात, तुमचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. तुम्हाला आवडला का? त्यावर फराहलासुद्धा हसू आवरले नाही. शेवटी हसत हसत बाय करत तिथून निघून गेली. फराहचा हा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.