Take a fresh look at your lifestyle.

‘बिग बॉस १३’ मध्ये सलमानच्या जागी फराह खान?

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | ‘बिग बॉस – १३’ च्या ग्रँड फिनाले ची तारीख पुढे गेल्याने अँकरिंग साठी सलमान उपलब्ध नसण्याची शक्यता जास्त आहे. उरलेल्या काळासाठी त्याला रिप्लेस कोण करेल याबाबतीत बऱ्याच चर्चा झाल्या. यातून दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर असलेल्या फराह खान हिचे नाव पुढे आले आहे.

सलमानला दबंग ३ चे प्रमोशन आणि बाकी इतरांना दिलेल्या तारखांमुळे वाढलेल्या काळात बिग बॉस साठी वेळ देणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे सुपरस्टार सलमानच्या मदतीसाठी फराह खानला पुन्हा एकदा कार्यक्रमाची सूत्रे हातात घ्यावी लागणार आहेत. याआधी देखील फराहने ‘बिग बॉस सिझन ८ हल्ला बोल’वेळी सलमान बजरंगी भाईजान च्या शूटिंगमुळे उपलब्ध नसल्याने काही काळासाठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होत.

@BiggBoss_Tak यावरील ट्विटनुसार यावेळी फराह खान काही एपिसोड्स सोबतच ‘ग्रँड फिनाले’ देखील होस्ट करणार आहे . आता याचा या पॉप्युलर कार्यक्रमाच्या ‘टीआरपी’वर काय परिणाम होतो ते वेळच सांगेल.

Leave a Reply

%d bloggers like this: