फराह खानने चंकी पांडेला फटकारले! म्हणाली, तू आधी लेकीला आवर; काय आहे प्रकरण..?
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने जेव्हढे चित्रपट केले नाहीत तेव्हढी ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय. आता भरीस भर तिचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेसुद्धा ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे फराह खानशी पंगा. होय. अनन्या पांडे आणि फराह खानचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर चंकी पांडेने फराह खानला ऍक्टिंग टीप देऊ केलीये तर यावर फराहने फिरवून लेकीवरून चंकीला सल्ला दिलाय. त्यांचा हा कमेंट बॉक्स सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या व्हिडीओमध्ये अनन्या मेकअप करताना दिसतेय आणि तेव्हा फराह खान त्याठिकाणी येते. फराह अनन्याला म्हणते तुला ‘खाली पिली’ सिनेमासाठी नॅशनल पुरस्कार जाहीर झाला आहे. ही गोष्ट ऐकून अनन्याला खूप आनंद होतो आणि हे पाहून फराह चंकी पांडेच्या स्टाईलमध्ये म्हणते “आई ऍम जोकिंग..” सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय आणि अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून हसत असतील यात काही शंकाच नाही. पण सध्या या व्हिडीओपेक्षा जास्त कमेंट्सची चर्चा आहे. या कमेंट्समध्ये एक कमेंट चंकी पांडेने केली आहे आणि याच कमेंटमुळे सध्या हशा पिकला आहे.
अनन्या पांडे हिने आपल्या इन्स्टा हॅण्डलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये ‘ओव्हर ऍक्टिंगसाठी 50 रुपये कट…’ असं लिहत फराहला व्हिडीओ टॅग केली आहे. एवढंच नव्हे तर, ‘फराह तू व्हिडीओमध्ये केलेल्या ओव्हर ऍक्टिंगसाठी तुला पुरस्कार मिळायला हवा..’ असंदेखील लिहिलं आहे.. त्यानंतर फराहने कमेंटमध्ये ‘चंकी, आधी तुझ्या लेकीला आवर…’ असा सल्ला दिला आहे. सध्या अनन्याचा हा व्हिडीओ आणि चंकी, फराहचा संवाद चांगलाच व्हायरल होतोय.