लगीनघटीका समीप आली..! मराठमोळ्या पद्धतीने फरहान- शिबानी एकरूप होणार
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ट्रेंडिंग कपलं अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर हे नेहमीच चर्चेत असतात. यानंतर आता अगदी काही तासांवर त्यांचं लग्न असताना त्यांची चर्चा होणार नाही असं कास होईल..? चंदेरी दुनियेतील हि जोडी उद्या विवाहबंधनात अडकत आहे. शनिवारी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी फरहान आणि शिबानी यांचे लग्न होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या रिती-रिवाजानुसार त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे याहीवेळी हे कपलं फार चर्चेत आहे.
बॉलिवूड मीडिया रिपोर्टनुसार, १९ फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे अख्तर यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर साता जन्माची गाठ बांधून एकरूप होणार आहेत. माहितीनुसार, या विवाह सोहळ्यात फरहान आणि शिबानी यांचे जवळचे मित्र आणि जवळील नातेवाईक सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती फरहान अख्तरची आई हनी ईरानी यांनी दिली आहे. दरम्यान लग्नाच्या आधीच्या सर्व रिती-रिवाजांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी १७ फेब्रुवारी रोजी शिबानीच्या मुंबईतील वांद्रेस्थित निवासस्थानी मेहंदीचा सोहळा अतिशय आनंदात पार पडला. यासाठी तिने जवळच्या मित्र परिवाराला आमंत्रित केले होते.
फरहान आणि शिबानी गेल्या ४ वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अखेर त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत ओळख देत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि उद्या १९ फेब्रुवारी रोजी हा बहुचर्चित विवाह संपन्न होईल. हा विवाह खाजगी पद्धतीने पार परडणार असून येथे मीडियाने विवाहाला उपस्थित राहून फोटो काढू नये म्हणून हा विवाहाबाबत अधिक माहिती दिली नाही असे हनी ईरानी यांनी स्पष्ट केले आहे. या लग्नासाठी केवळ जवळचे लोक, आप्तेष्ट मंडळी फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय याशिवाय अगदी खास मित्र परिवार उपस्थित राहील. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी पारंपरिक विवाह संपन्न झाला कि २१ फेब्रुवारी रोजी सिविल सेरेमनीमध्ये लग्न होईल.