Take a fresh look at your lifestyle.

फरहान अख्तरचा ‘तुफानी’ लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ !

टीम, हॅलो बॉलीवूड । बॉलीवूडचा अव्वल ऑलराउंडर फरहान अख्तरने भाग मिल्खा भाग मधून प्रेक्षकांसह समीक्षकांनाही इम्प्रेस केलं होतं. एक वर्षापूर्वी त्याने आपल्या ‘तूफान’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्ट केला होता. नुकताच त्याने त्याच्या पात्राचा फर्स्ट लुक रिव्हिल केला. पोस्टरमध्ये फरहान बॉक्सिंग जर्सीमध्ये अगदी मुरलेला बॉक्सर दिसत आहे. हातात हँडग्लोव्ह्ज आणि चेहऱ्यावर ‘प्रो’ वाला लुक आहे. चित्रपटातील बॉक्सरच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेतले.

तुफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. हा स्पोर्ट ड्रामा फरहान आणि राकेश यांचा एकत्रितपणे दुसरा प्रोजेक्ट असेल. यापूर्वी या दोघांनी 2013 मध्ये दिग्गज फील्ड स्प्रींटर मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केली असून यात परेश रावल देखील मुख्य भूमिकेत आहेत.

त्याच्या पोस्टमध्ये, हा चित्रपट यावर्षी 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचेही फरहानने नमूद केले. तो लिहितो, “जेव्हा आयुष्य कठिण होते, तेव्हा आपण आणखी बळकट होतात. 2 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होत आहे. नवीन वर्षानिमित्त हा लूक रिव्हिल करताना आनंद झाला. आशा आहे की आपल्याला ते आवडेल.”
येथे पोस्ट पहा: