Take a fresh look at your lifestyle.

पत्ता दे तुझा, म्हणत फरहान अख्तरने ट्रोलर्सची केली बोलती बंद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या पोस्टच्या माध्यमातून तो देशात घडणाऱ्या विविध मुद्यांसंबंधित आपले मत स्पष्टपणे मांडत असतो. अलीकडे अश्याच एका पोस्टमुळे तो चर्चेत आला होता. नुसता चर्चेतच नाही तर चांगलाच ट्रोल झाला होता. पण फरहाननेही एका मर्यादेनंतर ट्रोलर्सला चांगलेच उत्तर देत बोलती बंद केली आहे. फरहानचे ट्विट कोरोना व्हॅक्सिन संदर्भात होते.

फरहानने व्हॅक्सीनच्या वाढत्या किंमतीवर सरकारला थेट प्रश्न केला होता. यामळे तो ट्रोलर्सच्या चांगलाच निशाण्यावर आला होता. त्याचबरोबर लस दरवाढीबाबत सरकारची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर फरहानने पुन्हा एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले होते. फरहानने या ट्विटमध्ये लिहिले – ‘ प्रिय ट्रोलर्स, सरकार लस किंमतीत कपात करण्यासाठीही विचारत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व त्यांनाही टीएल अर्थव्यवस्थेविषयी व्याख्यान देऊन द्याल, जसे तुम्ही मला देत आहात. तोपर्यंत मास्क लावा, घरीच रहा आणि आपले तोंड धुवा .. म्हणजे हात !! ‘

यानंतरही ट्रोलर्सने फरहानला ट्रोल करणे सुरुच ठेवले होते. एका ट्रोलरने लिहिले, ‘तुझ्यासाठीच करत आहे, नाहीतर कोरोना पसरेल’. यानंतर फरहानदेखील मागे हटला नाही आणि त्याने या ट्रोलरचा थेट पत्ताच विचारला. ”पत्ता दे तुझा, मी एक नवीन विनोदी पुस्तक पाठवतो’असे लिहीत फरहानने ट्विट केले. त्याचवेळी फरहानच्या या ट्विटवर त्याच्या चाहत्यांकडून चांगलाच सपोर्ट मिळत आहे. बर्‍याच लोकांनी फरहानच्या ट्रोलरचा क्लास घेतला आहे.