Take a fresh look at your lifestyle.

का रे दुरावा? फोटो पोस्ट करत अनुष्काने व्यक्त केल्या विराटपासून दुरावल्याच्या भावना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटवीर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या फारच अस्वस्थ आहे. याचे कारण म्हणजे ती पती विराट कोहली यांच्यापासून फार दूर आहे आणि हा दुरावा तिला जाणवू लागला आहे. याबात अनुष्का शर्मा कोहलीने स्वतःच एक पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे तिची हि पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या दुराव्याचे कारण म्हणजे, क्वारंटाईन. होय. अनुष्का तिचा पती विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी दुबईत तर पोहोचली मात्र, तिला क्वारंटाईन रहावे लागत आहे. यामुळे तिचा हिरमोड झाला असून पतीपासून तिला दूर राहावे लागले आहे. यामुळे तिने विराटचे काही फोटो शेअर करत तिची अवस्था सांगितली आहे.

युएईमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा सुरु झाली आहे. यासाठी लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली हा भारतीय संघासह दुबईत आहे. दरम्यान अनुष्का शर्माने दुबईच्या हॉटेलचे काही फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अनुष्का दुबईत पोहोचल्यानंतर या हॉटेलमध्ये थांबली आहे. अहो थांबली अर्थात क्वारंटाईन आहे. परिणामी इतक्या लांबून पतीचा उत्साह वाढविण्यासाठी पोहोचलेली अनुष्का अद्याप कोहलीला भेटूदेखील शकली नाही. पण अनुष्काच्या पोस्टमध्ये विराट कोहली बाल्कनीत आणि हॉटेलच्या लॉनवर उभा राहून तिला ‘हाय’ करताना दिसत आहे. आता असा क्षण पाहिल्यानंतर का रे दुरावा? हा एकच प्रश्न पडतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

दरम्यान अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले आहे कि, “मी या दोन पैकी एक कॅप्शन निवडू शकले नाही – क्वारंटाईन आपल्या हृदयाला आणखी प्रेमळ बनवते आणि बबल असलेल्या जीवनात प्रेम. आपल्याला समजलेच असेल.” अनुष्काची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे अनेको चाहते आणि याचबरोबर सेलेब्स त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी असे म्हटले आहे कि तुमच्यातील हा दुरावा लवकर संपूदे.