महेश मांजरेकरांवर विविध कलमांतर्गत मुंबईतील माहीम पोलिसांत गुन्हा दाखल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने इंडस्ट्रीतील अत्यंत नामांकित सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश मांजरेकर यांच्या विरोधात मुंबईतील माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे महेश मांजरेकर कायदेशीर अडचणीत अडकले आहेत. याचे कारण असे कि, महेश मांजरेकर यांचा अलिकडेच रिलीज झालेला ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट वादग्रस्त ठरला होता. यातील दृश्यांबाबत निषेध दर्शवित हि तक्रार दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवली आहेत. शिवाय मुलांचे हे चित्रीकरण केलेली दृश्ये काढून टाकण्याबाबत अनेकांनी वारंवार सूचना करूनही तसे केले. उलट हि दृश्य दाखवण्यात आली आहेत. यामुळे महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पोस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप महेश मांजरेकर यांच्याकडून कोणतीही आणि काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यामुळे राज्य महिला आयोगाने चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली होती. यानंतर तो ट्रेलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आला होता. तसेच चित्रपटांतील आक्षेपार्ह दृश्यांनाही कात्री लावल्याचे मांजरेकरांनी सांगितले होते. या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर आणि ईशा दिवेकर या कलाकारांनी काम केले आहे.