Take a fresh look at your lifestyle.

लगीनघाई संकटात नेई? विकी कौशल आणि कॅटरिना कैफविरोधात तक्रार दाखल; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारी लगीनघाई आता कायदेशीर अडचणीत येते का काय? असा काहीसा सवाल उपस्थित झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे त्यांच्या विवाहाची जोरोशोरोसे तयारी आणि चर्चा सुरु आहे. आजपासून आर्थर ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान हा विवाहसोहळा गुप्तपणे पार पडणार आहे. हा लग्नसोहळा राजस्थान जयपूर येथील ७०० वर्ष जुन्या ऐतिहासिक वारस्याचा भाग असणाऱ्या किल्ल्यात पार पडणार आहे. यासाठी सवाई मधोपूर येथील एक आलिशान रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. एकीकडे एव्हढी जोरात तयारी सुरु असताना वर आणि वधु विरोधात जयपूर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

राजस्थान जयपूरमधील चौथ माता मंदिर हे अतिशय पुराणिक आणि भाविकांची वर्दळ असणारे मंदिर आहे. परंतु या मंदिराकडे जाणारा रस्ता विकी कॅटरिनाच्या लग्नासाठी बुक करण्यात आलेल्या किल्ल्यासमोरून जातो. परिणामी हा रस्ता बंद करण्यात आला असल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. हा रस्ता अशा पद्धतीने अडवल्याबद्दलच वर विकी आणि वधु कॅटरिना यांसह हॉटेल व्यवस्थापक आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौथ माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हवाला देत वकील नेत्रबिंदु सिंह जदौन यांनी जयपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा विधी प्राधिकरणात ही तक्रार दाखल करण्यात आली असून या लग्नसोहळ्या दरम्यान सामाईक मार्ग सुरळीत ठेवण्याची मागणीही यात करण्यात आली आहे. विकी आणि कॅट यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स या जुन्या किल्ल्याच्या रिसॉर्टमध्ये संपन्न होणार आहे. विकी आणि कॅटरिनासाठी हा दिवस खास करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि इव्हेंट कंपनी अतिशय मेहनत घेत आहेत. हा विवाह रजवाडी स्टाईलमध्ये होणार असून लग्नाचे कार्यक्रम ७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. या विवाहसोहळ्याबाबत गुप्तता पाळली जात आहे. तसेच या विवाहात येणाऱ्या पाहुण्यांना कॅमेरा वापरण्याचीसुद्धा परवानगी नाही. एकंदरच सुरळीत आणि सुनियोजित कार्यक्रम सुरु असताना मध्येच कायदेशीर कारवाईचे सूर लागले तर कदाचित कुठेतरी या शाही विवाह सोहळ्याला गालबोट लागू शकत.