Take a fresh look at your lifestyle.

नेपोटिझमचा डाग पुसायला करण जोहरने लढवली शक्कल आणि पुन्हा झाला ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक करण जोहर नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. करण जोहरने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना लाँच केले आहे. यामुळे तो कित्येकदा वादाच्या भोवऱ्यात अडकतो. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, वरुण धवन, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टारकिड्स करणचे बोट पकडून या मनोरंजन विश्वात दुडूदुडू धावत आले आहेत. या प्रत्येकाच्या लॉन्चवेळी करण जोहरवर नेपोटीझमचा प्रचार केल्याचा ठपका लावण्यात आला. यामुळे त्याचे बरेच फॉलोवर्स कमी झाले. म्हणून आता एक नवी शक्कल लढवत करणने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. मग काय? झाला पुन्हा ट्रोल.

काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ या चित्रपटातून अचानक काढून टाकल्यामुळे करण चांगलाच चर्चेत होता. यामुळे सोशल मीडियावर करण जोहरवर नेटीझन्सने तडातडा ताशेरे ओढत चांगलाच संताप व्यक्त केला होता. त्याच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचीही त्याला धमकी देण्यात आली. मात्र यावेळी त्याला लोकांच्या रागाला सामोरे जायचे नाही, म्हणून त्याने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. नुकताच त्याने I For India लिहिलेला एक बोर्ड हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. हे पाहून सोशल मीडियावरील वातावरण जरा जास्तच पेटले आहे. कोणतीही सहानभुती न दाखवता लोकांनी तीव्र भाषेत करणवर रेघोट्या मारल्या आहेत. परिणामी करणची हि शक्कल फ्लॉप झाली असून पुन्हा एकदा ट्रोलिंग टॉपला असल्याचे दिसत आहे.

कोरोनाकाळात सगळेच सेलिब्रेटी सद्या गरजुंना मदत करत आहेत. नुकतेच यशराज प्रोडक्शनने देखील सिने इंडस्ट्रीतील कामगारांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. अशात करण जोहर कसा पाठी राहणार? मग करणच्या धर्मा प्रोडक्शननेही कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. धर्मा प्रोडक्शन देखील यशराजप्रमाणेच मदत करणार आहे. सोशल मीडियावर धर्मा प्रोडक्शन लसीकरणाबाबतची संपूर्ण माहिती आणि मानसिक आरोग्य या बाबतीत लोकांची मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टीम युवा आणि धर्मा नेहमीच निस्वार्थ लोकांची सेवा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.