Take a fresh look at your lifestyle.

चित्रपट निर्माते पराग संघवींना बेड्या; कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित प्रकरणी EOW’ची कारवाई

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट निर्माते पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित प्रकरणी अटक केली आहे. EOW (Economic Offences Wing)ने पराग संघवी यांना गृहनिर्माण फसवणुकीच्या प्रकरणात कारवाई करीत अटक केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले कि, निर्मात्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर पुढे २५ डिसेंबरपर्यंत EOW’च्या कोठडीत पाठवण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. काही काळापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने परागच्या मुंबईतील कार्यालय, क्लब आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले होते. याचवर्षी सप्टेंबरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी संघवींच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले होते. यामध्ये त्यांचे कार्यालय आणि क्लबचा समावेश होता.

अहवालांनुसार, २०१८ सालामध्ये EOW’कडे संघवींविरोधात FIR आली होती. यात तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले होते कि, वांद्रेतील टर्नर रोडवरील एका इमारतीत सुमारे १४ कोटी किमतीचे ३ फ्लॅट होते. त्यातील एक फ्लॅट दोन कंपन्यांना भाडे तत्त्वावर दिला होता. त्यापैकी एक संचालक संघवी होता आणि उर्वरित २ फ्लॅट भाडेतत्त्वावर दिले होते. दरम्यान इमारत भाड्याने असतानाही कंपन्यांनी ते फ्लॅट विकल्याचा आरोप तक्रारदाराने फिर्यादीत केला आहे. याशिवाय २०१८ सालामध्ये IPL बेटिंग रॅकेटच्या तपासावेळी पराग संघवीची ठाणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. कारण सोनू जालान या बुकीच्या चौकशीत त्याचे नाव समोर आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी वर्षभराच्या तपासानंतर त्याला क्लीन चिट दिली. यानंतर आता पुन्हा एकदा कायद्याच्या फेऱ्यात संघवींची परतावणी झाली आहे. यानंतर कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

वर्क फ्रन्टबद्दल सांगायचे तर, पराग संघवी एक भारतीय चित्रपट निर्माता, अलुंब्रा एंटरटेनमेंट आणि लोटस फिल्म कंपनीचे सीईओ आहेत. ते बिझनेस मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहेत. के. सेरा सेरा मीडिया कंपनीचे माजी एमडी, चित्रपटांना वित्तपुरवठा आणि वितरणासाठी ते ओळखले जातात. पराग संघवी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नामांकित चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहेत. त्यांनी ‘अब तक छप्पन’ १ आणि २, ‘वास्तुशास्त्र’, ‘डरना मना है’, ‘डरना जरूरी है’, ‘गोलमाल-फन अनलिमिटेड’, ‘एक हसीना थी’, ‘नाच’, भूतनाथ रिटर्न्सआणि इतर अनेक चित्रपटांसाठी निर्माता म्हणून काम केले आहे. तर स्वतःच्या बॅनरखाली ‘सरकार’, ‘सरकार ३’, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ आणि ‘शेफ’ या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.