Take a fresh look at your lifestyle.

अखेर अभिनेता अद्वैत दादरकरने मागितली शिंपी समाजाची माफी; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील आगगाबाई सुनबाई मालिका चांगलीच गाजते आहे. अगंबाई सासूबाईच्या यशानंतर या मालिकेचे नवे पर्व अगंबाई सुनबाईच्या रूपाने प्रेक्षकांसमोर आले. काही चेहरे बदलले होते. मात्र ह्या कलाकारांनी अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची वाहवाह मिळवली आहे. या मालिकेतील वळणे आणि ट्विस्ट्स लोकांना नेहमीच भावताना दिसतात. मात्र या मालिकेतील एका एपिसोडमध्ये सोहम अर्थात अभिनेता अद्वैत दादरकर शुभ्रा अडचणीत यावी म्हणून तिचे शिवण कामाचे मशीन तोडताना व लाथाडताना दाखवला आहे. यामुळे ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच अडचणीत सापडली आहे. या दृश्याबदद्ल शिंपी समाजातील बांधवानी आक्षेप घेतला आहे. मात्र माध्यमांशी बोलताना अद्वैतने या समाजाची माफी मागितली आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘अगबाई सुनबाई’ या मालिकेत आवश्यक भूमिका व प्रसंग रंगविण्यासाठी या कलाकाराने शिलाई मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते. याच कारणावरून शिंपी समाज बांधवांकडून मालिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता ‘अगबाई सुनबाई’ मालिकेत सोहम नावाची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ‘अद्वैत दादरकर’ याने शिंपी समाज बांधवांची माफी मागितली आहे. माध्यमांशी बोलताना त्याने या दृश्यासाठी संपूर्ण समाजाप्रती आदर दाखवत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या दरम्यान तो म्हणाला ‘हा प्रसंग दाखवण्यामागे शिंपी समाजाच्या भावना दुखवण्याचा हेतु नव्हता. आम्हा सर्वांना याबद्दल भयंकर वाईट वाटतंय. आम्हाला चित्रिकरण करताना तसं सांगितलं होतं. हेतु जरी तो नसला तरीदेखील मनापासून मी माफी मागतो. यापुढे असं कुठलंही कृत्य आमच्याकडून घडणार नाही याची काळजी घेऊ. यानंतर कार्यक्रमाबाबत उठलेले तीव्र संतापाचे वादळ शांत झाले असले तरीही यापुढे चित्रकारणादरम्यान निश्चितच निर्मात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मनोरंजनासाठी कुणाच्या भावना दुखावणार नाहीत ह्याची काळजी घेणे त्यांची जबाबदारी असणार आहे.