हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय जोडी म्हणजे राणा दा आणि पाठक बाई. अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. यांचा २ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात अतिशय पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नासाठी अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी सहभागी झाले होते.
मोठ्या धुमधडाक्यात आणि शाहीर थाटात देवधर आणि जोशी कुटुंबांचे मनोमिलन झाले. सध्या सोशल मीडियावर हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाचे जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात मिसेस जोशींच्या उखाण्याचा व्हिडीओ तर तुम्ही पाहिलाच म्हणजे म्हणून खास तुमच्यासाठी.
अतिशय सुंदर माहोल, सगळीकडे फुलांच्या माळा, झगमगणारे प्रकाश दिवे आणि सुंदर नवरीसोबत राजबिंडा नवरा… किती साजिरी गोजिरी अशी हि जोडी. रील ते रिअल असा प्रवास गाठत प्रेक्षकांच्या मनात आता कायमचे राहणार राणा दा आणि पाठक बाई.. म्हणजेच ‘मिसेस आणि मिस्टर जोशी’. लग्न म्हटलं कि, पाऊणे राउळे, उठ बस, झगमगाट, आनंदीआनंद, वधूचं लाजणं आणि वराचं हासणं आलंच. पण यासोबत येतो तो उखाणा आणि त्याच्याशिवाय मिसेस झाल्याची मजाच काय..? मग आपल्या अक्षयाने पण घेऊनच टाकला एक रांगडा उखाणा… अक्षया म्हणते..,
खरं तर उखाणा असतो २ ओळींचा फक्त,
पण संधी चालून आलीये तर होइन म्हणते व्यक्त..
कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट,
प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट..
मग राणा जी राणा जी करत दिवस गेले सारून,
राणाच्या आतल्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून..
तुझ्यात जीव रंगत रंगत वेळ अली निघायचीच,
कुठे तरी एक खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची..
दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा,
अक्षय तृतीया मुगुर्ट ठरला आमच्या साखरपुड्याच्या..
उखाणा घेते म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून,
हो हो आता घेते नाव… ऐका कान देऊन
हो हो आता घेतेय नाव.. ऐका कान देऊन….
उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवली अशी,
माझंही नाव घेते तेवढ्यात ‘अक्षया हार्दिक जोशी’
सध्या हार्दिक आणि अक्षयाच्या अंगावरची हळद आणि मेहंदीचा रंग जेव्हढा गडद आहे तेव्हढ्याच गडद प्रेमाने चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देतआहेत.
त्यांच्या लग्नाचे आणि लग्न विधींचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नवविवाहित लाडक्या दांपत्याला ‘हॅलो बॉलिवूड’ समूहाकडून सुखी संसारासाठी आभाळभर शुभेच्छा!
Discussion about this post