Take a fresh look at your lifestyle.

अखेर.. ती शुक्राची चांदणी समोर आली; 35 फुट कटआऊटमधून चंद्रमुखी अवतरली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ कादंबरी डोळ्यासमोर ठेऊन मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक प्रसाद ओक याने ‘चंद्रमुखी’ या अनोख्या प्रेमकहाणीच्या चित्रपटाची घोषणा केली. अगदी तेव्हापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या टीझरपासून प्रेक्षकांची आतुरता अक्षरशः ताणली होती. कारण कॅप्शन सांगत होते कि हि एक प्रेमकहाणी आहे आणि ती हि एका राजकारणी युवकासोबत एका लावण्यवतीची. पण या भूमिका साकारतय कोण ते मात्र गुलदस्त्यात ठेवले होते. यानंतर अखेर हळूहळू यावरून पडदा उघडला. आधी तो ध्येयधुरंधर राजकारणी अर्थात दौलतराव या तडफदार नेत्याच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार हे स्पष्ट केलं. यानंतर चर्चा होती ती शुक्राच्या चांदणीची. म्हणजेच चंद्रमुखीची. अखेर आता तिचा चेहरा समोर आलाय आणि तो हि ३५ फूट कटआऊटमधून. त्यामुळे हा सोहळा सर्वांसाठीच एक जल्लोष होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच ३५ फुटांच्या कटआऊटचे अनावरण करून सिनेमातील अभिनेत्रीचा लूक सादर करण्यात आला आहे आणि असा भव्य कार्यक्रम @royaloperahouse सारख्या ठिकाणी पार पडला, ही मराठी चित्रपसृष्टीसाठी खरंच अभिमानाची बाब आहे. याचं सर्व श्रेय “चंद्रमुखी”चित्रपटाचे निर्माते आणि प्लॅनेट मराठीचे संस्थापक @akshaybardapurkar (अक्षय बद्रापूरकर) यांना जाते. अर्थात @aakashpendharkar (आकाश पेंढारकर) @amrutamane48 (अमृता माने) @metalpowdergirl यांच्याशिवाय हे शक्य झालंच नसतं.

चंद्राची भूमिका माझ्या माध्यमातून जिवंत केल्याबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक @oakprasad (प्रसाद ओक) यांचेही मनापासून आभार. @ajayatulofficial (अजय – अतुल) यांच्या संगीताशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता. तसेच, या चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात लोकांचे मनापासून आभार. तुमचं प्रेम असंच कायम राहो! तुमची चंद्रा…. हे कॅप्शन चंद्राने म्हणजेच चित्रपटातील चंद्रमुखी साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने लिहीत या सोहळ्याचा जल्लोषमयी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

याशिवाय अमृताने आपण साकारत असलेल्या चंद्रमुखी या भूमिकेबद्दल सांगितले कि, मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी आणि ताकदीची भूमिका मी ‘चंद्रमुखी’मध्ये साकारतेय. चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मला खूप आनंद आहे की, अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. अनेक दिवसांपासून ‘चंद्रमुखी’च्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला. जी उत्सुकता तुम्हाला होती, तशीच उत्सुकता आता मला चित्रपट झळकण्याची आहे. हा चित्रपट आम्ही या लोककलावंताना समर्पित करत आहोत. या निमित्ताने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असून या भव्य चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच घ्यावा.