Take a fresh look at your lifestyle.

‘अखेर टायगर 3’चं शूटिंग सुरु होणार; युरोपियन देशांमध्ये पहिले शेड्युल झाले फिक्स

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या टायगर चित्रपटाच्या सिरीजचा आगामी तिसरा भाग आता लवकरच चित्रित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चित्रीकरण बंद असल्यामुळे गतवर्षापासून या चित्रपटाचे चित्रीकरण काही ना काही कारणांमुळे ठप्प पडताना दिसले. मात्र अखेर आता लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असल्याची बातमी मिळत आहे. सूत्रानुसार, या चित्रपटाचे सगळे शेड्युल लावण्यात आले आहेत आणि येत्या महिन्यापासून चित्रीकरणाचा श्री गणेशा करणार आहेत.

टायगर ३ चे चित्रिकरण आता सुरू होणार असून पहिल्यांदा सलमान खान युरोपिय देशांत रवाना होणार आहे. तर येत्या १२ ऑगस्टपासून सुरू होणारे चित्रिकरण पुढे ५० दिवस सलग चालणार आहे. अनेक देशांमध्ये हे चित्रिकरण करणार असून सुरूवातीला सलमान या चित्रिकरणासाठी जाईल त्यानंतर कॅटरिना कैफ हे चित्रिकरण चालू करेल, अशी माहिती मिळत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण फ्रान्स, आयर्लंड, स्पेन या देशांमध्ये होणार आहे. अद्याप टायगर ३ चे मूळ नाव ठरले नसले तरी त्याला टायगर असेच नाव तात्पुरता देण्यात आले आहे.

या चित्रपटात सलमान खान, कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तर इमरान यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला पाकिस्तान का टायगर असं बिरूद लावले आहे. आयएसआय एजंट आणि भारतीय गुप्तचर विभागातला गुप्तहेर टायगर यांच्यातली चुरशीची लढत यात दाखवणार आहेत. या चित्रपटातील ऍक्शन सीन्स लार्जर दॅन लाईफ असतील याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी वेगवेगळ्या स्टंट मास्टर्सना दिग्दर्शनासाठी आमंत्रण दिले आहे.

हा चित्रपट ३०० कोटीचा बिग बजेट सिनेमा असून सलमानसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट असल्याचे समोर येत आहे. कारण त्याची मुख्य भूमिका असलेला राधे ओतितीवर आला खरा पण म्हणावे तितका कमावू शकला नाही. शिवाय राधे अनेकदा ट्रोल झाला आणि वादात सुद्धा अडकला. त्यामुळे आता आगामी सिनेमासाठी सलमानने कष्ट करण्याची पूर्ण तयारी केली आहे. इतकेच काय तर, येत्या काळात त्याचा मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटावर आधारलेला अंतिम हा चित्रपट देखील येणार आहे आणि याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.