Take a fresh look at your lifestyle.

सुशांत चा लाडका कुत्रा ‘फज’ कुठे आहे, घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येमुळे त्यांच्या अनेक फॅन्स का धक्का बसला. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूड विश्वात खळबळ माजली. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. अजूनही त्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. सुशांत च्या जाण्याने त्याच्या लाडक्या कुत्र्याचे फोटो वायरल झाले होते. त्याच्याबद्धल अनेक अफवा ही पसरवल्या गेल्या होत्या.

सुशांत चा लाडका कुत्रा फज हा नेमका कुठे आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच उत्तर सुशांत ची बहीण श्वेता हिने दिल आहे. हिने फज आणि सुशांत चे बाबा यांचा एक फोटो शेअर करत फजसोबत बाबा आहे असा कॅपशन देत लिहल आहे.फजला आता नवं घर मिळालं असून तो पाटण्यात सुशांतच्या वडिलांसोबत राहत आहे. या पोस्टमध्ये सुशांतचे वडिल फजला सांभाळताना दिसत आहेत. फज हा लॅब्राडोर जातीचा श्वान असून सुशांतचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. सुशांतने सोशल मीडियावर फजसोबत काही फोटो, व्हिडीओही शेअर केले होते.

सुशांतच्या निधनानं तर फज एकाकी पडला होता. मला फजसोबत राहायला आवडतं. तो अगदी लहान असल्यापासून माझ्याकडे आहे,” असं सुशांतने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Comments are closed.