Take a fresh look at your lifestyle.

OTT गाजवतोय डिसेंबर 2021; जाणून घ्या कोणकोणते चित्रपट आणि वेब सिरीज होणार रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो २०२१ या वर्षाचा शेवटचा महिना अर्थातच डिसेंबर २०२१ सुरु आहे. हे संपूर्ण वर्ष कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला होता. यामुळे राज्यभरातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद होती. तर लोकसुद्धा घरात बंद झाले होते. अशावेळी जर कुणी मनोरंजनाचा वसा हाती घेतला असेल तर तो होता ओटीटी प्लॅटफॉर्म. कारण संपूर्ण वर्षभर ओटीटीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यानंतर आता वर्षाअखेर ओटीटी आपला पवित्रा कसा काय सोडेल? म्हणूनच या महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित झाल्या आणि अजूनही होणार आहेत. काय मग उत्सुकता वाढली ना? चला मग वेळ न घालवता जाणून घेऊयात कोणते चित्रपट आणि वेब्सिरीज या महिन्यात कशी रिलीज होणार आहेत.

१) मनी हाईस्ट सीझन ५
– अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आणि मनी हाईस्टचा शेवटचा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. त्यामुळे आता प्रोफेसर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा शेवट काय झाला? बँक ऑफ स्पेनमधून सोन चोरी करण्याची त्यांची मनषा पूर्ण झाली का? स्पेशल फोर्सच्या निशाण्यावर प्रोफेसर आला तर नसेल? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर मनी हाईस्ट सीजन ५ चा शेवटचा पार्ट बघणं जरुरी आहे.

२) इनसाइड एज सीजन ३
– विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्डा स्टारर अमॅझोन प्राइमवर इनसाइड एज सीझन ३ ही वेब सीरीज देखील ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाली आहे. क्रिकेट क्षेत्रातील सट्टेबाजी आणि ग्लॅमरस दुनियेवर या सीरिजचे कथानक रचले आहे.

३) बॉब बिस्वास
– द बिग बुल या सिनेमाच्या यशानंतर आता अभिनेता अभिषेक बच्चन याचा बॉब बिस्वास हा सिनेमा देखील ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला आहे. झी ५ वर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल. या सिनेमाचे कथानक पूर्णपणे सस्पेंन्सवर आधारलेले आहे.

४) आर्य २
– आर्य १ या वेबसिरीजच्या उदंड प्रतिसादानंतर आर्य २ ही वेब सीरीज १० डिसेंबर २०२१ रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यात अभिनेत्री सुष्मिता सेनचेपात्र अतिशय उत्साहवर्धक आणि लक्षवेधी आहे.

५) अरण्यक
– अभिनेत्री रवीना टंडन ‘अरण्यक’ या वेब सीरीजच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. येत्या १० डिसेंबर २०२१ रोजी ही सीरीज नेटफ्लिक्सवर आपल्याला पाहता येईल. यात रवीना टंडन, आशुतोष राणा, जाकीर हुसैन, मेघना मलिक मुख्य भूमिकेत दिसतील.

७) डिकपल्ड
– अभिनेत्री सुरवीन चावला ‘डिकपल्ड’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तर या चित्रपटात अभिनेता आर माधवन प्रमुख भूमिकेत आहे. येत्या १७ डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

८) अतरंगी रे
– सारा अली खान,अक्षय कुमार,धनुष अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेला ‘अतरंगी रे’ हा अतरंगी सिनेमा येत्या २४ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट सिनेमागृहात तसेच हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना इतका भावला आहे कि, कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो असे सगळ्यांना झालेय.