Take a fresh look at your lifestyle.

देवाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारीवर FIR दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील ओळखीचा चेहरा अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच काही ना काही विषयांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. पण यावेळी ती आक्षेपार्ह विधानामुळे आधी चर्चेत आणि त्यानंतर आता अडचणीत आली आहे. भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये तिने देवाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ती चांगलीच वादात सापडली आहे. एका वक्तव्यामुळे ती तिच्यावर टीकांचा भडीमार होत आहे. यानंतर आता अभिनेत्री श्वेता तिवारीवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळमध्ये तिच्या आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी चालू पत्रकार परिषदेत देवाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल हे विधान केले आहे. हे विधान होते कि, माझ्या ब्रा’चे माप देव घेत आहे.

तिच्या या विधानानंतर सर्व स्तरांवरून तिच्यावर टीका सुरू आहे. त्यानंतर आता एफआयआर देखील दाखल झाली आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या अडचणी आणखी वाढणार यात काहीच शंका नाही. याआधीच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे कडक आदेश दिले होते.

श्वेताच्या आगामी वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनकरिता सध्या भोपाळमध्ये स्थित आहे. तर हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये यासाठी पत्रकार परिषद भरवली असताना श्वेताने ‘मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. श्वेता तिवारी हि एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेमूळे आजही लोकांच्या लक्षात आहे. शिवाय हिंदी बिग बॉसच्या चौथ्या सिझनची श्वेता विजेती आहे. श्वेता तिवारीने हिंदी आणि भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत बऱ्याच चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.