Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पूजा मलेरियासारखी असते.. त्याच्यामूळे दंगली होतात; ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाविरोधात FIR दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Lalsingh Chaddha
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चड्डा हा चित्रपट चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट आणि चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता आमिर खानविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे कि, ‘या चित्रपटाने लष्कराचा अपमान केला असून, हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.’ त्यामुळे विनीत यांनी आमिर खान, चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.

https://twitter.com/RAVIMISHRA_TV/status/1558327616570277893

हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वादात होता. बॉयकॉट लाल सिंग चड्ढा असा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता. मात्र, चित्रपटाच्या रिलीजनंतर कुठेतरी हा वाद थांबेल अशी अपेक्षा होती. पण झालं उलटंच. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा वाद आणखीच वाढला आहे. शिवाय याचे परिणाम आता आमिर खानलाही भोगावे लागणार आहेत. ANI’च्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तक्रारदार वकील विनीत जिंदाल यांनी चित्रपटातील काही गोष्टी आक्षेपार्ह आहेत असा आरोप केलाय. ज्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 153, 153A, 298 आणि 505 अंतर्गत अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्स विरुद्ध एफआयआर नोंदवावा, असे म्हटले गेले आहे.

FIR against Amir Khan, accused of insulting 'Indian Army'

A complaint has been filed against Amir Khan u/s 153, 153, 298, & 505 of the IPC in Delhi. It is alleged that Aamir has hurt the sentiments of d Indian Army and Hindus in d movie '#LalSinghChaddha#BoycottLalSinghChaddha pic.twitter.com/7ayA6CAjl5

— HindUstaNi (@HindU__staN) August 13, 2022

माहितीनुसार, या चित्रपटामध्ये कारगिल युद्धादरम्यान एक मानसिकदृष्ट्या कमजोर वा असक्षम म्हणता येईल अशी व्यक्ती भारतीय सैन्यात भरती होताना दाखवण्यात आले आहे. कारगिलचे युद्ध लढण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतलेले सैन्य पाठवण्यात आले होते आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतरच सैनिक कोणत्याही युद्धावर जाऊ शकतात. मात्र या चित्रपटातून सैन्याचा अपमान केलाय, असे जिंदाल यांचे म्हणणे आहे.

या चित्रपटात काही अशी दृश्ये आहेत ज्यामुळे हा वाद आणखीच उफाळला. यातील एका सीनमध्ये पाकिस्तानी सैनिक म्हणतो की, ‘मी नमाज अदा करतो, तुम्ही का करत नाही? यावर लालसिंग म्हणतात की, ‘माझी आई म्हणते, ही सगळी पूजा मलेरियासारखी आहे. त्यामुळे दंगली होतात.’ या संवादामुळे लोकांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Tags: aamir khanDelhi High CourtFIR Filedlalsingh chaddaOfficial Trailer
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group