Take a fresh look at your lifestyle.

‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय’; ‘इर्सल’ चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ अशी हटके टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ या मराठमोळ्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे. हा फर्स्ट लूक अतिशय लक्षवेधी असल्यामुळे असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली आहे. या चित्रपटाचे नाव एकदम वेगळे आणि पोस्टर अतिशय उत्कंठता वाढविणारे आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गुलाल उधळल्याचे दिसत आहे. तसेच यात एक हात दिसतोय आणि त्या हातात पिस्तूलदेखील दिलेत आहे. या पोस्टरच्या खालील बाजूस बैठी वस्ती वा एखादी मोठी झोपडपट्टी असावी असा काहीसा परिसर दिसून येतोय. याशिवाय काही उंच इमारती देखील दिसत आहेत. या चित्रपटाची हेडलाईन हटके आहेच, शिवाय पोस्टरही जबरदस्त आहे. पण यावरून चित्रपटात काय असेल याचा अंदाज लावणे मुश्किल आहे.

‘इर्सल’ हा चित्रपट येत्या ३ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सामान्य मराठी भाषेनुसार ‘इर्सल’ या शब्दाचा अर्थ इर्षा असा होतो. यामुळे ‘इर्सल’ हा आगामी मराठी चित्रपट शहरी, निम शहरी वा मोठ्या महानगरातील राजकारण तसेच गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा असेल असा एक प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हा चित्रपट भलरी प्रॉडक्शनची पहिली निर्मिती आहे. या चित्रपटात विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही नवी जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. शिवाय या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, अभिनेत्री माधुरी पवार यांच्यासह ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, सुजाता मोगल, शरद जाधव, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, हनिफ शेख या कलाकारांच्या अन्य प्रमुख भूमिका आहेत.

‘इर्सल’ या चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची आहे. तर पटकथा अनिकेत बोंद्रे यांच्यासह महेशकुमार मुंजाळे यांनी तयार केली आहे. चित्रपटातील संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. तर गीत- संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी पूर्ण केली आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून संजय ठुबे यांनी काम पहिले आहे. शिवाय चित्रपटाचे संकलन संतोष गोठोसकर, ध्वनी पियुष शाह, कला सिद्धार्थ तातूसकर, नृत्य धैर्यशील उत्तेकर, वेशभूषा सोनिया लेले – सहस्त्रबुद्धे, रंगभूषा सुहास गवते व महेश बराटे, केशभूषा दीपाली ढावरे यांनी केले आहे.