Take a fresh look at your lifestyle.

‘तू आणि मी, मी आणि तू’; रुपाली चाकणकरांच्या हस्ते लेकाच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर हा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून सोहम चाकणकर एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा प्रेमाची आहे आणि यामध्ये सोहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाले. ते हि सोहमची आई अर्थात रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हे पोस्टर लॉन्च झाले. मुख्य म्हणजे सोहमच्या वाढदिवशी आई मुलाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरचे त्याच्याच आईच्या हस्ते अनावरण करण्यात आले हि विशेष बाब आहे.

‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम गणेश नामक समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारत आहे. शिवाय या चित्रपटातून सोहमचा रोमँटिक अंदाज आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोहमसोबत अभिनेत्री शिल्पा ठाकरे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटाची निर्मिती राजू तोडसाम, ऋषभ कोठारी आणि सागर जैन यांनी जैन फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. कपिल जोंधळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. तर चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे. शिवाय चित्रपटाचे संगीत संगीतकार प्रशांत सातोसे यांनी केले आहे आणि कॅनव्हास व्यंकट कुमार यांनी केला आहे.

या कार्यक्रमादरम्यान रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या कि, सर्वप्रथम सोहमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांचे मनापासून आभार की माझ्या मुलाला या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी त्यांनी दिली राजकारणात मला कोणताही वारसा नसताना मी जशी या क्षेत्रात उतरले तसेच माझ्या मुलाने सोहमने चाकणकर कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसताना अभिनय क्षेत्रात स्वकर्तृत्वावर करिअर करण्याचा निर्णय घेतला. माझे बॅकग्राऊंड राजकीय असल्याने शूटिंग दरम्यान सोहमने मला एक विनंती केली की, तू चुकूनही सेटवर येऊ नको कारण तू जर सेटवर आलीस तर संपूर्ण टीमला राजकीय दबावाच दडपण येईल आपण ही क्षेत्र वेगवेगळी ठेवू असे त्याने मला सांगितले. ”

शिवाय ट्विटर पोस्ट करतानाही त्यांनी भावुक कॅप्शन दिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे कि, सोहम,आज तुझा वाढदिवस,आज तुझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले,त्यावेळी मी समोर बसले होते आणि तु मिडियासमोर बोलत होता,तुला माझ्याबद्दल प्रश्न विचारला,उत्तर देताना तुझे भरुन आलेले डोळे पाहुन माझ्याही कडा ओल्या झाल्या. वीस वर्षापुर्वी सोहम माझ्या कडेवरुन जग पाहत होता,आता स्वतःचेच नवे जग तयार केले .तुझ्या चित्रपट क्षेत्रातील या विश्वात तुला अफाट यश मिळू दे,उत्कृष्ट अभिनेता होशील ही खात्री आहे ,पण उत्कृष्ट माणुस नक्की होशील हा दृढ विश्वास आहे कारण तु माझ्या गर्भात वाढला आहे. तुझ्या सर्व स्वप्नांना गरुडाचे पंख मिळू देत ,जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घाल ,माझं आयुष्य मिळू दे माझ्या बाळाला हि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !