Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एकदम डिट्टो…!! अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकमधील पंकज त्रिपाठींचा लूक व्हायरल; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 26, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Mai Atal Hoon
0
SHARES
38
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी आगामी काळात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून नेहमीच पंकज त्रिपाठी यांनी विविध ढंगाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत त्रिपाठींना पहायला त्याचे चाहते आतुर होते आणि अखेर.. हि प्रतीक्षा संपली. अटलजींच्या जयंती निमित्त २५ डिसेंबर रोजी या चित्रपटातील पंकज त्रिपाठींचा वाजपेयींच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी नेतृत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ख्याती आहे. त्यामुळे वाजपेयींची भूमिका साकारणे हे कोणत्याही कलाकारासाठी जितके मानाचे तितकेच आव्हानात्मक आहे. हे आव्हान अभिनेता पंकज त्रिपाठी उत्तम पेलणार अशी खात्री त्यांच्या चाहत्यांनी दाखवली आहे. अशातच या भूमिकेतील त्रिपाठींचा फर्स्ट लूक समोर आला आणि अनेकांनी डिट्टो.. हूबेहून, जसेच्या तसे, कार्बन कॉपी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

हा लूक शेअर करताना पंकज त्रिपाठींनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि,’ ‘अटल’ जी यांचे व्यक्तित्व पडद्यावर साकारण्यासाठी अत्यंत संयमाने मला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं गरजेचं आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु स्फूर्ति आणि मनोबल याच्या जोरावर मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन असा मला अटल विश्वास आहे’

View this post on Instagram

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव करत आहेत. या चित्रपटाचा एक छोटासा टिझर देखील शेअर केला आहे ज्यामध्ये वाजपेयींच्या विविध छटा दर्शविल्या आहेत. याआधी शनिवारी पंकज त्रिपाठी यांनी बायोपिकचे नाव जाहीर करीत भावना व्यक्त करताना म्हटले होते कि, ‘मनात रोमांच दाटून आलाय, थोडीशी भीती देखील वाटतेय, मनात अनेक भावनांचा कल्लोळ आहे, पण सिनेमाप्रतीची निष्ठा बळ वाढवतेय आणि हा सगळा उत्साह अटलजींना समर्पित.. आता ‘मैं अटल हूँ…’. अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर साकार करणं म्हणजे एखाद्या कठीण परिक्षेला बसण्यासारखंच आहे. पण या परिक्षेसाठी अटलजींचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला अटळ विश्वासही आहे. ‘मैं अटल हूँ…’ लवकरच.’

Tags: Atal Bihari VajpayeeBiopic MovieInstagram PostMai Atal Hoonpankaj tripathiRavi JadhavUpcoming Bollywood Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group