Take a fresh look at your lifestyle.

‘लाईन दे मला’ रिलीज; ना चिठ्ठ्या, ना व्हाटसॲप.. थेट भिडणारं ‘भिरकीट’चं गाणं चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ हा आगामी मराठी चित्रपट येत्या १७ जून २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट मस्त धमाल विनोदी कथानकासह कौटुंबिक नाते जपणारा आहे. या चित्रपटात जबरदस्त संगीतदेखील ऐकायला मिळेल. ‘भिरकीट’ च्या टिझर आणि पोस्टरची आधीच सोशल मीडियावर चर्चा आहे. यानंतर आता याच चित्रपटातील गाणी रिलीज झाली आहेत. हा सांगितिक सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.

भिरकिट चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील ‘लाईन दे मला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यामध्ये आले मोनालिसा बागल आणि तानाजी गालगुंडे यांची प्रेमकहाणी पहायला मिळतेय. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. तर सून या गाण्याचे बोल नकास अजीज, आनंदी जोशी यांनी लिहिले आहे. याशिवाय ‘आसवांची’ आणि ‘गॉगल’ या ठसकेदार लावण्यादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आसवांची’ हे भावनिक गाणे शैल हाडा यांनी गायले आहे. तर गॉगल’ हे गाणे उर्मिला धनगर, मंगेश कांगणे यांनी गायले आहे. या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत.

‘भिरकीट’चे दिग्दर्शक अनुप जगदाळे लाईन दे मला या गाण्याविषयी आणि चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की,” हा एक धमाल विनोदी चित्रपट तर आहेच, शिवाय या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. ‘लाईन दे मला’ या गाण्यात तानाजी गालगुंडे प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला अनुसरून शब्दबद्ध करण्यात आली आहेत. लाईन दे मला हे संपूर्ण गाणे तानाजी आणि मोनालिसा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात आम्ही रोमान्ससोबतच धमालही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन तानाजीला अनुसरून केले आहे. त्याने अतिशय उत्तमरित्या हे नृत्य सादर केले आहे, हे गाणे पाहताना त्याचा अनुभव येईलच. तानाजीनेही या नृत्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.