Take a fresh look at your lifestyle.

शिव्या देऊन दमलीस वाटतं..; खान कुटुंबासोबत ईद साजरी केल्यामुळे कंगना झाली ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच या ना त्या कारणावर काहीतरी भाष्य करायचं आणि वाद स्वतःहून ओढून घ्यायचे असा भलताच छंद असणारी बॉलिवूड अभिएन्ट्री कंगना रनौत सध्या सोशल मीडिया गाजवताना दिसतेय. पण यावेळी कुणावर टीका केली किंवा कोणते वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून नाही तर वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. खरंतर चर्चेत नाही ती सोशल मीडियावर ट्रोल होतेय आणि याच कारण ठरलंय ईद पार्टी. होय. बॉलीवूडमधील खान मंडळींना सतत काही ना काही मुद्द्यांवरून झाडणारी कंगना चक्क सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष्य शर्मा यांच्या ईद पार्टीमध्ये दिसली. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.

आतापर्यंत सलमान, शाहरुख आणि आमिर या बॉलिवूडमधील प्रसिद्ध खान मंडळींना कंगनाने नेहमीच पाण्यात पाहिलं आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीवर कंगनाने बोललाच पाहिजे असा काहीसा तिनं नियमच केला होता. यानंतर ज्यांना शिव्या देते त्यांच्याच पार्टीत कशी जाते म्हणत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंगना ही सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष यांच्या ईद पार्टीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी तिनं त्या पार्टीमध्ये फोटोग्राफर्सला वेगवेगळ्या पोझ देखील दिल्या आहेत. ज्यामुळे चाहतेही चक्रावले आहेत.

सलमानच्या या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. यामध्ये दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी, शहनाज गिल यांच्या नावाचा समावेश आहे. तरीही यामध्ये कंगनाची हजेरी चांगलीच चर्चेत राहिली आहे. सलमानच्या पार्टीमध्ये कंगनाचे सहभागी होणे हे तिच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

काहींनी लिहिलं कि, या पार्टीमध्ये तू कशी जाऊ शकतेस..? शिव्या देऊन दमलीस का.? तर आणखी एकाने लिहिले आहे, नेहमी मुस्लिमांवर टीका करणारी कंगना त्या पार्टीमध्ये गेलीच कशी..? दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, आमच्यासमोर त्या अभिनेत्यांना शिव्या द्यायच्या आणि त्यांच्या पार्टीमध्ये सहभागी व्हायचे हे कंगनाला कसे जमते…? अशा प्रश्नांनी सध्या सोशल मीडिया दणाणून सोडला आहे.