Take a fresh look at your lifestyle.

‘माझी बदनामी केली.. मला 5 कोटी भरपाई द्या’; किरण मानेंची पॅनोरामा’कडे मागणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील नामक भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने याना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटल्याचे दिसून आले. आपण सोशल मीडियावर सातत्याने मांडलेल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकले असे मानेंनी सांगितले होते. तर प्रोडक्शन आणि वाहिनीकडून किरण मानेंचे महिला कलाकारांशी वर्तन चांगले नव्हते म्हणून त्याना काढले असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय स्तरावर मोठा गदारोळ झाला होता.

अनेक नेते मंडळी आणि कलाकारांनी या वादात उडी घेतली होती. यानंतर आता प्रकरण मिटले असे वाटत असताना किरण माने यांनी आपले वकील असीम सरोदे यांच्यासह मुंबईतील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, किरण माने यांनी प्रोडक्शनकडून आपली बदनामी झाली म्हणून नुकसान भरपाई म्हणून मला ५ कोटी रुपये द्यावेत’ अशी मागणी केली आहे.

या पत्रकार परिषदेत किरण माने यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर वक्तव्य केले आहे. दरम्यान किरण माने म्हणाले कि, मला अन्यायकारक आणि अपमानास्पद पद्धतीने काढून टाकणाऱ्या पॅनरोमा इंटरटेनमेंटच्या हुकुमशाही पद्धतीमुळे मला विनाकारण मनस्तापाताला सामोरे जावे लागले आहे. लोकांना भरकटवण्यासाठी महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप सांगत माझी नाहक बदनामी करण्यात आली. माझ्या करिअरचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. कौटुंबिक नुकसान झाले आहे. माझे वडील अत्यंत गंभीर आजारी पडले आहेत. माझी सामाजिक प्रतिमा ठरवून डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे.

पुढे म्हणाले कि, त्याची नुकसान भरपाई म्हणून प्रोडक्शन हाऊस आणि संबंधीत महिलांनी माझी माफी मागावी. मला या सगळ्या नुकसानीची भरपाई म्हणून ५ कोटी रुपयांचे कॉम्पेनसेशन द्यावे अशी माझ्या वतीने माझे वकील असीम सरोदे यांनी प्रोडक्शनला नोटीस पाठवली आहे. तसेच डिस्नी अमेरिका, डिस्नी इंडिया, स्टार इंडिया, स्टार प्रवाह यांच्याकडे माझी अशी मागणी आहे कि, तुमचे मुलभूत नियम मोडून बेकायदेशीर कारवाई केल्याबद्दल आणि खोटी माहिती देऊन तुमची दिशाभूल केल्याबद्दल पॅनरोमा इंटरटेन्टमेंटसोबत असलेले तुमचे सर्व करार रद्द करुन त्या कंपनीला बॅन करावे, अशी मागणी करतो आहे. या प्रेस कॉन्फरन्सनंतर कदाचित प्रोडक्शन हाऊस अडचणीत येऊ शकते अशी शक्यता सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.