Take a fresh look at your lifestyle.

तिला नाही कसे म्हणू..? लेकीच्या आनंदासाठी मंदिरा बेदीने शेअर केला हसरा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि योगा लव्हर मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. दरम्यान तिला चांगलाच धक्का लागला होता मात्र आता कुठे थोडी थोडी ती या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करते आहे. पुन्हा एकदा नव्या उम्मीदने हळूहळू आयुष्य सुरळीत करायला तिने सुरुवात केली आहे. मंदिराने अलिकडेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर वर्कआऊट केल्यानंतरचा स्वतःचा एक हसरा चेह-याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले की, ‘या खास व्यक्तीच्या मागणीवरून फोटो काढण्यात आला आहे…’

अभिनेत्री मंदिरा बेदीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती वर्कआऊटच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. अर्थात हा फोटो वर्कआऊट केल्यानंतर काढण्यात आला असून ती यात घामाघूम असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये मंदिराने लिहिले आहे कि, ‘जेव्हा माझी छोटीशी लेक वर्कआऊटनंतर मला हसायला सांगते, तेव्हा endorphins आपले काम करतात.. मग तिला नाही कसे म्हणू..? ‘ असे लिहित मंदिराने तिच्या या पोस्टच्या शेवटी #beginagain #ilovemondays असे हॅशटॅगदेखील वापरले आहेत.

याआधीदेखील मंदिरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. त्यामुळे ती नेहमीच तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. कधीकधी पती राज सोबतचे फोटोदेखील ती शेअर करत आठवणींना उजाळा देत.

दरम्यान, मंदिरा बेदीचे पती आणि निर्माता, दिग्दर्शक राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३० जून २०२१ रोजी निधन झाले आहे. मृत्यूदरम्यान ते ४९ वर्षाचे होते. राज यांच्या निधनामुळे मंदिरावर एकाकीपणाचे दुःख साहण्याची वेळ आली. निश्चितच दुःखाचा डोंगर फार मोठा होता. मात्र आपल्या मुलांकडे पाहून तिने या दुःखावर मात करण्याचे मनाशी ठरवले आहे आणि ती यासाठी प्रयत्नशील आहे.