Take a fresh look at your lifestyle.

फ्रेण्ड्स मालिकेतील ‘या’ कलाकाराचे निधन..

0

चंदेरी दुनिया । फ्रेण्ड्स या मालिकेचे चाहते जगभर आहेत. या मालिकेची कथा, या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भावलेले आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील एका कलाकाराचे नुकतेच निधन झाले आहे.

फ्रेण्ड्स या मालिकेतील रॉन लिबमन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाले. रॉन यांनी या मालिकेत रेचल ग्रीनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेत लगेचच चिडणाऱ्या गृहस्थाची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रॉन हे अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात असून 1950 ला त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

रॉन यांचे काम पाहाणाऱ्या अबराम्स आर्टीस्स या एजन्सीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी याबाबत एक पत्रक जाहीर केले असून त्यात लिहिले आहे की, रॉन हे उत्तम अभिनेते होते. त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली. त्यांचे निधन नुकतेच झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी जेसिका आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: