Take a fresh look at your lifestyle.

आता रुपेरी पडद्यावर अवतरणार फुलराणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साधारण वर्षभरानंतर रुपेरी पडद्याचे काम हळूहळू पूर्वपदावर येऊ पाहत आहे. शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करीत चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. होळी आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधून “फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी” या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत घोषणा करण्यात आली आहे.

‘पिग्मॅलिअन’ या ग्रीक नाट्यावर आधारित ‘माय फेअर लेडी’ हा म्युझिकल चित्रपट जगभर गाजला होता. याच कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाचे काम जोरात सुरू झाले आहे.

‘फुलराणी’ ही प्रत्येक मराठी मनाला भिडलेली कलाकृती आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावर अवतरणारी फुलराणी कोण असणार? कशी असणार? हे आणि असे अनेक प्रश्न प्रेक्षक मनाला भेडसावत आहेत. हि ‘फुलराणी’ पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञांची नावे नुकतीच एका पोस्टरद्वारे जाहीर केली आहेत.

‘फुलराणी … अविस्मरणीय प्रेमकहाणी’ चे लेखन गुरु ठाकूर व विश्वास जोशी या दिग्गजांनी केले आहे. चित्रपटातील गीते बालकवी व गुरु ठाकूर यांनी रचली आहेत. तर संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, संकलन गुरु पाटील आणि कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांच्या हाती आहे. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड हे कार्यकारी निर्माते आहेत. रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांची असून नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. तर फिनक्राफ्ट मिडिया प्रोडक्शन या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. उत्तमोत्तम कलाकार आणि विशेष प्राविण्य प्राप्त तंत्रज्ञांच्या साथीने २०२१ मध्येच बहरणार फुलराणीचा बहर.. ही “फुलराणी” प्रेक्षकांना नक्कीच भाळेल, असा विश्वास दिग्दर्शक ‘विश्वास जोशी’ यांनी व्यक्त केला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.