Take a fresh look at your lifestyle.

‘गणपत’ आ रेला है; टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅननच्या आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफ एका वेगळ्या भूमिकेतून लवकरच समोर येणार आहे. मुख्य म्हणजे टायगरसोबत बॉलिवूड जगतातील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री क्रिती सॅनन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हि जोडी या आधी प्रेक्षकांनी ‘हिरोपंती’मध्ये एकत्र पाहिली होती. तेव्हा हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांसाठी अगदीच नवीन होते. मात्र आता त्यांनी एक वेगळी जादू प्रेक्षकांवर केली आहे. यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर व्हिडीओ रिलीज झाला आहे. तर क्रितीने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

आगामी चित्रपट ‘गणपत’ हा पुढच्या वर्षी २३ डिसेंबर २०२०० मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक विकास बहल हे दिग्दर्शित करत आहेत. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चित्रपटाशी संबंधित असणारा टायगरचा अनोखा लूक पाहायला मिळतोय. या चित्रपटात टायगर एकदम हटके स्टाईलमध्ये दिसणार आहे. बोले तो एकदम अपून तपून. या चित्रपटात टायगर पहिल्यांदाच एका गुंड भूमिकेत दिसणार आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगरने लिहिले की, ‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरेला है ‘गणपथ’, तैयार रहना!’ २३ डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सध्या हा टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. कारण या व्हिडीओमध्ये टायगर म्हणतो, अपुन के दो ही बाप हैं, एक गॉड और दूसरी जनता, दोनों ने बोला आने को। तो अपुन आ रहा है।’ या संपूर्ण व्हिडीओमध्ये जे बॅकग्राउंड म्युझिक चालू आहे, ते खूपच कमाल आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी क्रिती सॅननचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. ज्यात ती बाईकवर बसलेली दिसली. हे पोस्टर शेअर करताना क्रितीने लिहिले होते कि, ‘जेसीला भेटा. यासाठी सुपर डुपर उत्साहित आहे!! माझ्या अतिशय खास मित्रासोबत अर्थात टायगर श्रॉफसोबत पुन्हा एकदा एकत्र आले आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.