Take a fresh look at your lifestyle.

‘गंगुबाई काठियावाडी’चा कल्ला; पहिल्याच दिवशी जमवला 10 कोटींचा गल्ला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक वाद विवाद, अडचणी, कोर्ट प्रकरणानंतर अखेर २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांत ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर चित्रपटाचे कथानक, कलाकारांची अभिनय शैली आणि गाण्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच रंग जमवला आहे. अगदी पहिल्या शोपासून संपूर्ण दिवसात आणि आजही चित्रपटाचा प्रत्येक शो हाऊसफुल्ल झाला आहे. मुख्य म्हणजे अनेक चित्रपटगृहातील तिकिटे संपली पण प्रेक्षकांचा ओघ कायम राहिला. पहिल्याच दिवसात गंगुबाई काठियावाडी’ने तब्बल १०.५ कोटींची मोठी कमाई केली आहे. त्यामुळे निर्माते आणि कलाकार यांच्या आनंदाला भरती आली आहे. याशिवाय केवळ प्रेक्षक नाही तर समीक्षकांनीही या चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे.

संजय लीला भन्सालींचा बहुचर्चित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ हा बिग बजेट आणि भव्यदिव्य सेट असणारा एक वेगळे पण सत्य कथेवर आधारित कथानक असलेला चित्रपट आहे. यातील मुख्य भूमिका गंगुबाई हि अभिनेत्री आलिया भटने अत्यंत कमाल साकारली आहे. तिने वठवलेली गंगू प्रेक्षकांना काय तर समीक्षकांनाही आवडली आहे. या चित्रपटातील वेशभूषा, गाणी, डायलॉग सारं काही सोशल मीडियावर हिट ठरलं आहे. हा चित्रपट पुढे बराच काळ बॉक्स ऑफिस गाजवणार असा समीक्षकांचा दावा आहे.

संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट मुंबईच्या रेड लाईट एरिया कामाठीपुरा येथील अत्यंत प्रभावशाली महिलेच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी जोरावर असल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन धोक्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आणि अखेर हा चित्रपट रिलीज झाला. याचिकाकर्ता भक्कम केस मांडू शकला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. हि याचिका गंगूबाईचा दत्तक मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केली होती.

गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात अनेक कलाकार पहायला मिळत आहेत. पहिलं नाव म्हणजे आलिया भट जिने गंगुबाई हे पात्र साकारलं आहे. तर दुसरं नाव म्हणजे अजय देवगण ज्याने करीम लालाचं पात्र साकारलं आहे. करीम लाला यांनी गंगुबाईंना आपली लहान बहीण मानले होते. या चित्रपटात त्यांचे नटे दिसून आले आहे. याशिवाय हुमा कुरेशी, शंतनू माहेश्वरी, विजय राझ असे अनेक तोडीचे कलाकार या चित्रपटात एकत्र पडद्यावर पहायला मिळत आहेत.