Take a fresh look at your lifestyle.

‘गंगुबाई काठियावाडी’ OTT रिलीजसाठी सज्ज; ‘या’ दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संजय लीला भंसाळी यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ २५ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात प्रदर्शित झाला. दरम्यान या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट दिसली आहे. तिच्या या भूमिकेचे कौतुक सर्व स्तरांवरून केले गेले. यामुळे आलियाच्या यशस्वी चित्रपटांमध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’चा समावेश झाला. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांना हा चित्रपट सिनेमा गृहात जाऊन पाहण्याची संधी मिळाली नाही. म्हणूनच संजय लीला भंसाळी यांच्या निर्णयानुसार आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यास सज्ज आहे. येत्या २६ एप्रिलचा मुहूर्त गाठून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. याचे काही ओटीटी टिझर अलीकडेच प्रदर्शित झाले आहेत.

खूप चर्चा, वाद आणि कॉंट्रोव्हर्सीनंतर गेल्या २५ फेब्रुवारी रोजी ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर काही काळातच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार अशी नुसतीच सर्वत्र चर्चा होती. यानंतर अखेर प्रतीक्षा संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण आता या चित्रपटाच्या ओटीटीवर प्रदर्शित होण्याची तारीख समोर आली आहे.

या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १३० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या चित्रपटाने आणखी कमाई करणे अपेक्षित होते. मात्र ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ‘द काश्मीर फाइल्स’ आणि त्यानंतर ‘आरआरआर’ हे चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे या सिनेमाच्या कमाईला कुठेतरी अडथळा आला.

यानंतर आता ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट मोठा पडदा गाजवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म गाजविण्यासाठी सज्ज आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. याबाबत नेटफ्लिक्सने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक टीझर शेअर करत माहिती दिली आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट, अजय देवगण आणि शंतनू मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री हुमा कुरेशी हिने एका गाण्यासाठी गेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित असून सत्य कथेशी संबंधित आहे.