Take a fresh look at your lifestyle.

हास्यजत्रेच्या गौरवचा गृहमंत्र्यांच्या हस्ते गौरव; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम एक कॉमेडी शो आहे. या शोने अनेकांना हसवलं अगदी खळखळून हसवलं. या कार्क्रमातील प्रत्येक कलाकार कसा हटके आहे. स्वतःवर विनोद करून इतरांना हसविणारे हे कलाकार हास्यजत्रेची जान आहेत. यापैकी एक म्हणजे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. गौऱ्याच प्रत्येक स्किट कमाल असत. स्वतःचा कितीही अपमान झाला तरीही तो जोक आहे म्हणून हसून आपल्यालाही हसविणारा गौरव कमालीचा स्टार आहे. म्हणूनच गौरव मोरे याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. याबाबत त्याने एक खास पोस्ट लिहिली आहे.

गौरव मोरे याला नुकतंच एका पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. या पुरस्काराचे नाव भीमरत्न पुरस्कार असे आहे. हा पुरस्कार त्याला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांपैकीच एक फोटो स्वतः गौरव मोरे याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय. हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

या पोस्टमध्ये गौरव मोरे याने लिहिले आहे कि, ‘भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२… खरच मी हया पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणाऱ्यांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्या सारख्याला पण एवढा मोट्ठा मान आपण दिलात. खुप आभारी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सोबत महाराष्टाचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब, मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते. धर्मात्मा फाउंडेशनचे खुप खुप आभार मानतो. सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो.’