Take a fresh look at your lifestyle.

अटकेच्या भीतीने गेहना वशिष्ठचा ड्रामा; अटक न करण्यासाठी पोलिसांनी १५ लाख मागितल्याचा केला दावा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून पॉर्नोग्राफी प्रकरणाची चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीपासून अन्य सर्व स्तरांवर जोरदार सुरु आहे. त्यात आरोपी म्हणून अटकेत असणाऱ्या राज कुंद्राच्या अडचणी रोज नव्याने वाढत आहेत. राज कुंद्रा सध्या पुढील तपासादरम्यान १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. तर राजच्याही आधी अभिनेत्री गेहना वशिष्ठ या प्रकरणात पोलीस कोठडीची हवा खाऊन आली आहे. त्यात आता पुन्हा तीच्या अटकेची शक्यता असताना तिने भीतीपोटी सर्व दोष मुंबई पोलिसांवर टाकला आहे. दरम्यान तिने दावा केला आहे की, पोलिसांनीच तिला या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्रा आणि एकता कपूरचे नाव घेण्यास भाग पाडले आणि तिला अटक होऊ नये म्हणून १५ लाख रुपयांची मागणी केली. या नंतर मात्र तिचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

इंडिया टुडे या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गेहना वशिष्टने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, तिला अटक न करण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पोलिस तिला म्हणाले कि जर तिने पैसे दिले तर तिला अटक करणार नाही. याशिवाय ती म्हणाली, मी पोलिसांना पैसे दिले नाहीत कारण मी काहीही चुकीचे केले नाही. मी काम केलेले सर्व व्हिडीओ बोल्ड होते. मात्र अश्लील असे त्यात काहीच नव्हते. अशा परिस्थितीत राज कुंद्रा आणि मी काहीही चुक केलेले नाही.

पॉर्नोग्राफी प्रकरणात गेहनाला ४ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ती जामिनावर बाहेर आहे. मात्र या आठवड्यात तिच्याविरुद्ध सलग तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तिच्या अटकेची शक्यता आहे. सरम्यान गेहनाने एका व्हिडीओत म्हटले कि, मुंबई पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन केले आहे. अशा पद्धतीने ती वारंवार पोलिसांवर आरोप लावताना दिसत आहे. शिवाय या प्रकरणात अलीकडेच प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राला पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी १९ जुलै रोजी अटक केली आहे आणि या संदर्भात पोलीस तपस करत आहेत.