हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख आणि तिचा पती रितेश देशमुख हे दोघेही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. जेनेलिया सातत्याने आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून काहींना काही शेअर करत असते. या दोन्ही उभयंतांचे काही व्हिडिओदेखील चांगलेच व्हायरल झाले आहेत. जेनेलियाने आता खेडेगावातील झाडाच्या पाराखाली मुलांना शिकवत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यासोबत आम्ही आमच्या पूर्वजांकडून पृथ्वीचा वारसा घेत नाही, आम्ही आमच्या मुलांसाठी ती उसनी घेत आहोत. असेही लिहिले आहे. एकूणच मुलांच्या पालनपोषणासंदर्भात सजग असणारे हे दांपत्य आपल्या मुलांना खेडेगावातील वातावरणाशी आणि संस्कारांशी जुळवून घेण्यास शिकवत असल्याचे दिसून येते आहे.
‘मुले आश्चर्यकारक असतात आणि ते प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेतात परंतु पालक म्हणून आणि विशेषत: या काळात खूपच हरवले आहोत.. आपण काळजी करत असतो,आपल्या मुलांना कोणत्या जगात आणणार आहोत. असे वाटत असते. माझं पालन-पोषण शहरात झाले आहे तर रितेशचं शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात झाल्याने त्याला दोन्हीबद्दल प्रेम आहे.मला बऱ्याचदा थोडीशी ईर्ष्या वाटते आणि मग त्यातूनच मला वाटलं की मी मुलांना शक्य तितक्या निसर्गाशी, प्राण्यांच्या जवळ ठेवावे. संचारबंदीला तीन महिने होऊन गेले आहेत आम्ही मुंबईपासून दूर आहोत. आमच्या गावात राहिलो आहोत. आता संचारबंदी उठवल्यामुळे शेतात जाण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने मुलांना एक नवीन वर्ग मिळाला.’ असे लिहून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुलांना झाडाखाली बसून वाचन, लेखन शिकवत असताना पालक म्हणून मला खूप समाधान वाटतं आहे. सभोवतालच्या परिसराबद्दल त्यांना जागरूक असलेले पाहताना, प्राण्यांबद्दल अधिक दयाळू असल्याचे पाहताना खूप समाधानी वाटते आहे असे म्हणत तिने कुणीतरी ‘आम्ही आमच्या पूर्वजांकडून पृथ्वीचा वारसा घेत नाही, आम्ही आमच्या मुलांसाठी ती उसनी घेत आहोत.’ हे अगदी बरोबर आहे असे म्हणते आहे. एकूणच जेनेलियाने निसर्गप्रेम आणि निसर्गाबद्दलची आपुलकी दिसून येते आहे.