Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या सुनबाईंचे बॉलिवूडमध्ये कमबॅक; जिनिलियाची पोस्ट व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी अख्ख्या महाराष्ट्राची सून आहे. अभिनेत्री जिनिलिया डिसूझा हिने मराठमोळ्या रितेशसोबत लग्न केले आणि ती डिसुझाची देशमुख झाली. संपूर्ण महाराष्ट्राने या जोडीवर भरभरून प्रेम केले आहे. इतकेच काय तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरासाठी जिनिलिया सुनबाई झाली. हे जोडपे मनोरंजन सृष्टीतील अत्यंत गोड कपल आहे. ते नेहमीच चर्चेत असतात. मग एकत्र असो किंवा वेगळे. मुलांच्या जन्मानंतर जिनिलियाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता पण आता ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये रुजू झाली आहे. याची माहिती तिने स्वतःच दिली आहे.

Genelia

जिनिलियाने स्वतःच हि आनंदाची बातमी शेअर करीत चाहत्यांना खुश केले आहे. ती पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होतेय पाहून तिचे चाहते भारी खुश झाले आहेत. तीच पुनरागमन इंडस्ट्रीची गरज आणि चाहत्यांची इच्छा आहे. मोठ्या गॅपनंतर आता ती पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाली आहे.

मुख्य म्हणजे गेल्या काही काळापासून ती बॅक-टू-बॅक नवे नवे प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. अलीकडेच रितेशसोबत तिने मिस्टर मम्मीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. यानंतर तिने आता ‘ट्रायल पिरियड’ नावाच्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली. याच प्रोजेक्टची माहिती देताना जिनिलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

जिनिलियाने इंस्टाग्रामवर इन इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. तिने सेटवर जाताना हा व्हिडीओ कारमधून शूट केला होता. त्याचा एक फोटो शेअर करत तिने लिहिले होते कि, “माझी ही आणखी एक नवीन सुरुवात आहे – नवीन चित्रपट “ट्रायल-पीरियड” या वर्षीचा चौथा चित्रपट आहे, खुप छान वाटतयं” या पोस्टवरून एकंदरच जिनिलिया पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री करतेय ते समजतंय. इतकंच काय तर ती एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्ससाठी चित्रीकरण करत आहे आणि ती आपल्या चाहत्यांसाठी एकाच वेळी मोठा धमाका घेऊन येतेय.