Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेमाचा धडा देण्यासाठी जिनिलियाची मराठी मालिकेत एंट्री; व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
144
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय कलाकार जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याही पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे जोडपं प्रचंड चर्चेत आहे. खूप वर्षांनंतर रितेश आणि जिनिलिया एकत्र मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तसेच रितेशने या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी आणखीच खास आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियासुद्धा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ती आता मराठी मालिकेतही दिसणार आहे. तास एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

सध्या कलाविश्वात रितेश आणि जिनिलियाचा ‘वेड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यामुळे रितेश आणि जिनिलिया आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. या निमित्ताने जिनिलिया देशमुख आपल्याला स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मराठी मालिका ‘रंग माझा वेगळा’मध्ये पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्ताने आणि वेड चित्रपटाच्या प्रमोशन ऍक्टिव्हिटीमूळे जिनिलिया मालिकेतही दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या मालिकेतील जिनिलियाची एंट्री हि अतिशय खास असून मालिकेतील मुख्य पात्र दीपा आणि कार्तिक यांच्या प्रेमाचा दुआ ती होणार आहे. तसेच प्रेक्षकांना प्रेमाचा अर्थ सांगण्यासाठी जिनिलिया या मालिकेत दिसणार आहे. जिनिलिया वेड या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपट सृष्टीत मुख्य भूमिकेत काम करणार आहे. या पूर्वी तिने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.

Tags: Genelia D'souza Deshmukhmarathi serialRang Maza VeglaRiteish deshmukhUpcoming Marathi MovieVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group