Take a fresh look at your lifestyle.

‘घोस्ट स्टोरीज’चा ट्रेलर रिलीज; झोया, करण, अनुराग उडवणार तुमची झोप!

0

हॅलो बॉलिवूड, ऑनलाइन । ‘लस्ट स्टोरीज’ च्या यशानंतर करण जोहर, झोया अख्तर अनुराग कश्यप, दिवाकर बॅनर्जी या दिग्दर्शक चमूने पुन्हा एकदा एकत्र येऊन ‘नेटफ्लिक्स’ साठी ‘घोस्ट स्टोरीज’ नावाची फिल्म बनवली आहे. याचा ट्रेलर थोड्या वेळापूर्वी युट्युबवर रिलीज करण्यात आला आहे.

लस्ट स्टोरीजमध्ये राधिका आपटे, कियारा अडवाणी, आकाश ठोसर, भूमी पेडणेकर, विकी कौशल, मनीषा कोईराला यांनी या वेबशो मधून चांगली ओळख मिळवली होती. यावेळी जान्हवी कपूर, मृणाल ठाकूर यांनी काही खास भूमिका वठवल्या आहेत.

इंडस्ट्रीतील आघाडीचे चार डिरेक्टर एकत्र येऊन एक फिल्म बनवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा 2013 मध्ये ‘बॉम्बे टॉकीज’ मधून झाला होता. तो फसला पण त्यानंतर नेटफ्लिक्स या वेब प्लॅटफॉर्मवर लस्ट स्टोरीज ने वाहवा मिळवली. त्यानंतर त्याचाच पुढचा भाग तेच चार डिरेक्टर घेऊन येतायेत ‘घोस्ट स्टोरीज’ मधून. या चारही भयकथा असून 2 ते 3 तास प्रेक्षकांना त्यांच्याच लॅपटॉप स्क्रिनवर गुंतवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

https://youtu.be/hsab-HJ7kqc

Leave a Reply

%d bloggers like this: